TRENDING:

अल्पवयीन मुलीला सोशल मीडियावरील मित्राशी झालं प्रेम, आत्महत्येची धमकी देत केलं लग्न, पुढे घडलं भयानक

Last Updated:

अल्पवयीन मुलीला आपल्या वयापेक्षा मोठ्या वयाच्या मुलावर प्रेम झाले. त्यामुळे दोघांमध्ये प्रेम चांगलेच फुलल्यावर ते आपले लग्न लावून देण्यासाठी नातेवाईकांना विनंती करू लागले. तसेच लग्न लावून दिले नाही तर आत्महत्या करू अशी धमकीही त्यांनी दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राहुल दवे, प्रतिनिधी
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

इंदूर : देशात अनेक अनैतिक संबंधांच्या घटना समोर येत आहेत. तसेच अनैतिक संबंधातून झालेल्या वाद विवादाच्याही घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची सर्वत्र एकच चर्चा होत आहे.

अल्पवयीन मुलीला आपल्या वयापेक्षा मोठ्या वयाच्या मुलावर प्रेम झाले. त्यामुळे दोघांमध्ये प्रेम चांगलेच फुलल्यावर ते आपले लग्न लावून देण्यासाठी नातेवाईकांना विनंती करू लागले. तसेच लग्न लावून दिले नाही तर आत्महत्या करू अशी धमकीही त्यांनी दिली. त्यामुळे त्यांच्या या धमकीला त्यांचे कुटुंबीय घाबरले आणि त्यांनी अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिले. मात्र, लग्नाच्या दोन महिन्यातच जे घडलं, त्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे. इतकेच नव्हे तर लग्न लावून देणारे पंडितचीही पोलिसांच्या चौकशीत अडकले आहे.

advertisement

काय आहे प्रकरण -

ही घटना इंदूरच्या चंदन नगर परिसरातील आहे. याठिकाणी पोलिसांनी लाडो अभियान कोर ग्रुपचे सदस्य महेंद्र पाठक यांच्या तक्रारीवर वर अर्पित, त्याचे वडील रमेश, आई रुकमा यांच्यासह मुलीचे आई-वडील, मोठे वडील आणि लग्न लावून देणारे पंडित ओम यांच्याविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये विवाहानंतर एक महिन्याने गुन्हा दाखल केला आहे.

advertisement

अयोध्येतून पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मोठी भविष्यवाणी; राम मंदिराचे मुख्य पुजारी काय म्हणाले?

महेंद्र पाठक पाठक यांनी लोकल18 ला दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबीयांनी आपल्या इच्छेने दोघांचे लग्न 24 एप्रिल रोजी इंदूर येथे लावून दिले होते. 21 मे रोजी त्यांना चाइल्ड हेल्पलाइन भोपाळवरून लग्नाची माहिती आणि तक्रार मिळाली होती. यानंतर कोअर ग्रुपची टीम तेथे चौकशीसाठी गेली. दोघांच्या वयाचा दाखला आणि लग्नाचे फोटो जमा करण्यात आले.

advertisement

यानंतर या प्रकरणाची चौकशी करत कुटुबीयांच्या आणि आजूबाजूच्या लोकांच्या जबाबावरुन माहिती समोर आली की, मुलगी अल्पवयीन असून 15 वर्षांची आहे. अल्पवयीनचा विवाह हा कायद्याने गुन्हा आहे. यानंतर पथकाने सर्व पुरावे दाखवल्यावर गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

म्हशीच्या बरोबरीनं दूध देते ही बकरी, मिळेल भरपूर नफा, नेमकं काय कराल?

advertisement

मुलीचे वडील काय म्हणाले -

या सर्व प्रकारामुळे अल्पवयीन मुलीचे वडील रडू लागले. ते म्हणाले, सोशल मीडियावर मुलीची एका मुलाशी मैत्री झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि त्यांनी लग्न करण्याचे ठरवले. मुलीने लग्नाचा हट्ट धरला. आम्ही तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही ती आपल्या हट्टावर कायम राहिली.

जर लग्न लावून देण्यात आले नाही तर ती आत्महत्या करेल, अशी धमकी तिने दिली. तसेच मुलानेही आपल्या कुटुंबीयांवर दबाव टाकला. दोन्ही जण आपल्याला कुटुंबीयांना धमकावू लागले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या आनंदासाठी त्यांचे लग्न लावून दिले, असे ते म्हणाले. या घटनेची सर्व परिसरात जोरदार चर्चा होत आहे.

मराठी बातम्या/देश/
अल्पवयीन मुलीला सोशल मीडियावरील मित्राशी झालं प्रेम, आत्महत्येची धमकी देत केलं लग्न, पुढे घडलं भयानक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल