अयोध्या : देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे. आतापर्यंत 5 टप्प्यांतील मतदान संपन्न झाले असून सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. देशात कुणाचे सरकार येणार, कोण पंतप्रधान होणार, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. प्रभू श्रीरामाची नगर अयोध्येतही पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार का, याबाबतच्या चर्चा शिगेला पोहोचल्या आहेत. यातच आता अयोध्येमध्ये प्रार्थनाही केल्या जात आहेत.
advertisement
यावर आता राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनावेत, यासाठी प्रत्येक दिवशी प्रभू श्रीरामाचा आशिर्वाद घेत आहेत. त्यांनी याबाबत महत्त्वाची भविष्यवाणी केली आहे.
कल्पनाही करू शकत नाही, इतके श्रीमंत होणार! 2025 पर्यंत या तीन राशीच्या लोकांवर राहुची कृपा
काय आहे ही महत्त्वाची भविष्यवाणी -
राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी महत्त्वाची भविष्यवाणी करताना सांगितले की, देशात भारतीय जनता पक्षाचे पूर्ण बहुमताचे सरकार येईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत. दरम्यान, याआधीही त्यांनी सत्येंद्र दास यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत भविष्यवाणी केली होती. विशेष म्हणजे त्या सर्व भविष्यवाणी खऱ्या सिद्ध झाल्या होत्या. यानंतर आता पुन्हा त्यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. आम्ही प्रभू श्रीरामाला ही प्रार्थना करतो देशात तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच राहावेत, असे ते म्हणाले.
शनि जयंतीला आवर्जून करा ही 7 कामे, साडेसातीतून होईल सुटका, वर्षभर मिळेल शनिदेवाचा आशिर्वाद
ते पुढे म्हणाले की, मी भविष्यवाणी केली आहे की, मोदी हे देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. ही जी निवडणूक होत आहे, या निवडणुकीच्या संबंधात 4 तारखेला निर्णय होऊन जाईल आणि 4 तारखेला हेसुद्धा सिद्ध होईल की, मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. रामललाच्या भूमिपूजनानंतर स्वत: मोदीजी आले आणि त्यांच्याहस्ते प्राणप्रतिष्ठा झाली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रामललाचा आशिर्वाद आहे. त्यांच्यावर रामललाची कृपा आहे. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत हा आशिर्वाद नक्की मिळेल आणि ते तिसऱ्यांदा पतंप्रधान पदाची शपथ घेतील आणि आपला संकल्प पूर्ण करतील. आममचा आशिर्वाद त्यांच्यावर आहे. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत, यासाठी प्रभू श्रीरामाला प्रत्येक दिवशी आशिर्वाद मागत असल्याचे त्यांनी सांगितले.