शनि जयंतीला आवर्जून करा ही 7 कामे, साडेसातीतून होईल सुटका, वर्षभर मिळेल शनिदेवाचा आशिर्वाद
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, शनि जयंती ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी शनिदेवाचा जन्म झाला होता, अशी मान्यता आहे. त्यामुळे ज्येष्ठ अमावस्येचे धार्मिक महत्त्व आणखी वाढते
दुर्गेश सिंह राजपूत, प्रतिनिधी
नर्मदापुरम : शनि जयंतीचा सण हा 6 जून रोजी गुरुवारी साजरा केला जाणार आहे. शनि जयंतीचा दिवस हा शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी शनिदेव यांना प्रसन्न करण्यासाठी भाविक अनेक उपाय करतात. ज्योतिषाचार्य पंडित पंकज पाठक यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली.
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, शनि जयंती ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी शनिदेवाचा जन्म झाला होता, अशी मान्यता आहे. त्यामुळे ज्येष्ठ अमावस्येचे धार्मिक महत्त्व आणखी वाढते. शनिदेवाला न्यायदेवता म्हटले जाते. यादिवशी शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी त्यांची विशेष पूजा केली जाते. शनि जयंतीला भाविक हे चांगले कर्म घडावे आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी शनिदेवाची मिळावी म्हणून प्रार्थना करतात. शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी शनि जयंतीचा दिवस हा सर्वात्तम दिवस असतो, असेही ज्योतिषाचार्यांनी सांगितले.
advertisement
शनि जयंतीला करा ही 7 कामे -
1. शनि जयंतीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तामध्ये उठून अंघोळ केल्यावर शनिदेवाची विधीपूर्वक पूजा करायला हवी. यानंतर शनि मंदिरात जाऊन पूजा करायला हवी. शनि मंदिरात जाऊन दर्शन करावे. शनिदेवाला मोहरीच्या तेलात तीळ मिसळून त्यांचा अभिषेक करावा. तसेच तिळाच्या तेलानेही शनिदेव यांना अभिषेक करू शकतात.
advertisement
2. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि दोष आहे, त्या व्यक्तीने या दिवशी शनि मंदिरात जाऊन पिंपळाच्या वृक्षाला पाणी टाकावे. याशिवाय शनि चालिसाचा पाठ करुन नंतर शनिदेवाच्या मंत्रांचा जप करावा.
3. शनि जयंतीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला मोहरीच्या तेलाने बनवलेली पोळी किंवा पोळीवर मोहरीचे तेल टाकून खाऊ घालावी. कावळ्याला अन्न देणेही शुभ मानले जाते. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात.
advertisement
4. शनि जयंतीच्या दिवशी हनुमानाला चमेलीच्या तेलाचा दिवा दान करायला हवा. त्यांना शेंदूर तसेच एक कापडही अर्पण करावा. मान्यतेनुसार, हनुमानजीच्या भक्तांना शनिदेव कधीच त्रास दोत नाहीत. त्यामुळे असे केल्याने तुमच्यावर शनिदेवाची कोप तुमच्यावर होणार नाही.
5. शनि जयंतीच्या दिवशी हनुमान चालिसा किंवा सुंदरकांडचे पठण करावे. असे केल्याने तुम्हाला शनिदोषापासून मुक्ती मिळेल. सोबतच शनिदेव लवकरच तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला आशिर्वाद देतील.
advertisement
खूप सारा पैसा, प्रत्येक क्षेत्रात प्रगती, जून महिना हा या 3 राशींच्या लोकांसाठी Golden time
6. शनि जयंतीच्या दिवशी गरिबांना काळे तीळ, वस्त्र, उडिदाची डाळ, जोडे-चप्पल आणि काळी शाल दान करू शकता. गरिबांची सेवा केल्याने शनिदेवाची कृपा तुमच्यावर होईल.
7. शनि जयंतीच्या दिवशी तुम्ही विधीनुसार, उपवास करायला हवा. या दिवशी काळे कपडे घालावेत आणि शनिदेवाची पूजा केल्याने तुमच्यावर शनिदेवाची कृपा तुमच्यावर होईल. जर शक्य नसेल तर पूर्ण दिवसात केवळ एकदा जेवण करुन उपवास करावा.
advertisement
सूचना : ही माहिती राशि-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांशी संवाद करुन लिहिली गेली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
Location :
Madhya Pradesh
First Published :
May 24, 2024 11:45 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
शनि जयंतीला आवर्जून करा ही 7 कामे, साडेसातीतून होईल सुटका, वर्षभर मिळेल शनिदेवाचा आशिर्वाद