TikTok भारतात सुरू होणार?
टिकटॉकवरील बंदीबाबत कोणतीही अनब्लॉक ऑर्डर भारत सरकारने जारी केलेली नाही आणि अशा प्रकारच्या बातम्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत, अशी माहिती सरकारी सूत्रांनी एएनआयला दिली आहे. गेल्या दोन दिवसापासून टिकटॉक पुन्हा अॅप नाही तर वेबसाईटच्या माध्यमातून दिसेल, असा रिपोर्ट फिरत होता. मात्र, ही माहिती खोटी असल्याचं समोर आलं आहे.
advertisement
टिकटॉक ब्लॉक का केलं?
जून 2020 मध्ये जेव्हा भारत सरकारने टिकटॉक आणि इतर 58 चिनी अॅप्सवर बंदी घातली तेव्हा कोणतीही पूर्वसूचना न देता ही घोषणा करण्यात आली. यामुळे भारतातील 20 कोटी सक्रिय टिकटॉक वापरकर्ते अचानक प्लॅटफॉर्मवरून डिस्कनेक्ट झाले. सरकारने 'डेटा प्रायव्हसी' आणि 'राष्ट्रीय सुरक्षेचा धोका' असल्याचे कारण देत टिकटॉक ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून, भारतातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एकामध्ये हे अॅप ब्लॉक करण्यात आले आहे. अशातच आता अचानक टिकटॉक अनब्लॉक झाल्याची अफवा समोर आली होती.
इन्टाग्राम रिल्सने जागा घेतली
दरम्यान, TikTok हे एकेकाळी भारतात सर्वाधिक डाऊनलोड होणाऱ्या अॅप्सपैकी एक होते. ज्याचे 200 दशलक्षांहून अधिक वापरकर्ते होते. मात्र सध्या तरी TikTok ने भारतात पुनरागमनाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. अॅप अजूनही बंद आहे. पण TikTok गेल्यानंतर इन्टाग्राम रिल्सने त्याची जागा घेतली अन् नेटकऱ्यांना नवा पर्याय उपलब्ध झाला.