थार कारमध्ये काही उरलंच नाही. संपूर्ण कारचा चक्काचूर झाला. या अपघातात गाडीतील सहापैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण अत्यंत गंभीर जखमी आहे. दिल्ली-जयपूर महामार्ग क्र. ४८ वर (NH-48) राजीव चौक एक्झिट (Exit 9) जवळ भरधाव वेगात असलेल्या एका थार कारचा भीषण अपघात झाला. ही धक्कादायक घटना गुरुग्राममध्ये घडली. या अपघातात गाडीतील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक तरुण गंभीर जखमी झाला.
advertisement
उत्तर प्रदेशातून काही कामानिमित्त हे तरुण गुरुग्रामला आले होते. काळरात्रीचा प्रवास त्यांच्यासाठी अखेरचा ठरला. सेक्टर-४० पोलीस स्टेशनचे एसएचओ ललित यांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेली ही काळी थार कार (क्रमांक UP नोंदणीकृत) झारसा फ्लायओव्हरजवळील एक्झिटच्या दुभाजकावर आदळली.
हा अपघात इतका भयानक होता की, गाडीवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले आणि थार थेट दुभाजकावर आदळल्याने अक्षरशः चेंदामेंदा झाली. गाडीचा दर्शनी भाग पूर्णपणे निकामी झाला. या दुर्घटनेत तीन महिला आणि दोन पुरुष अशा पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला. सहावा प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याला गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
वेगाची किंमत जीव देऊन चुकवली
पहाटेच्या वेळी वेगावर नियंत्रण न ठेवल्यामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. निष्पाप तरुणांचा अचानक झालेला मृत्यू पाहून परिसरात शोककळा पसरली आहे. क्षणभराच्या चुकीमुळे एका क्षणात उद्ध्वस्त झालं. पोलिसांनी सगळे मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. जखमी व्यक्तीची चौकशी केली जाणार आहे.