TRENDING:

Ladki Bahin Yojana e-KYC : लाडक्या बहिणींनो सेतु कार्यालयात रांग लावायची गरज नाही! घरबसल्या करा ई केवायसी, A TO Z माहिती

Last Updated:

Maharashtra Government Schemes : सेतु कार्यालयात रांग लावायची गरज नाही. मोबाइल अ‍ॅप किंवा वेबसाईटवर जाऊन आधार कार्ड आणि बँक माहिती नोंदवता ई-केवायसी पूर्ण करता येते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतर्गत सर्व लाभार्थी महिलांना आता त्यांच्या ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. राज्य सरकारने या प्रक्रियेसाठी दोन महिन्यांचा कालावधी निश्चित केला आहे. या आदेशानुसार प्रत्येक लाभार्थ्याने आपली ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या म्हणण्यांनुसार ही प्रक्रिया लाभार्थ्यांच्या हितासाठी आहे. या ई-केवायसीमुळे लाडकी बहीण योजनेतून सन्मान निधी वितरण अधिक सुलभ, पारदर्शक आणि सुसूत्र होईल. त्यामुळे लाभार्थ्यांना कोणत्याही गैरसोयीशिवाय निधी मिळविण्यास मदत होईल.
News18
News18
advertisement

जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

घरबसल्या ही ई-केवायसी सहजपणे करता येणार आहे.त्यासाठी सेतु कार्यालयात रांग लावून वेळ वाया घालवण्याची गरज नाही. सर्वात आधी लाभार्थ्यांनी https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. मुखपृष्ठावर उपलब्ध e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर ई-केवायसी फॉर्म उघडेल.

फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करावा. त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून Send OTP बटणावर क्लिक करावे. या प्रक्रियेनंतर आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. ओटीपी फॉर्ममध्ये भरून Submit बटणावर क्लिक केल्यास प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची ई-केवायसी आधीच पूर्ण झाली आहे की नाही. जर आधीच पूर्ण असेल तर स्क्रीनवर ''ई-केवायसी आधीच पूर्ण झाली आहे'' असा मेसेज दिसेल.

advertisement

जर ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसेल, तर प्रणाली लाभार्थ्याचा आधार क्रमांक ''मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण'' योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासेल. जर आधार क्रमांक पात्र यादीत नोंदलेला असेल, तर पुढील टप्प्यावर जाता येईल. या टप्प्यात लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच कॅप्चा कोड नमूद करून संमती दर्शवावी आणि Send OTP बटणावर क्लिक करावे. मोबाईलवर आलेला ओटीपी भरून Submit क्लिक करावा.

advertisement

यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल. त्यानंतर काही प्रमाणित (Declaration) बाबी स्वीकाराव्या लागतील, त्या पुढीलप्रमाणे आहेत:

1. माझ्या कुटुंबातील सदस्य कोणत्याही शासकीय विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत नियमित/कायम कर्मचारी म्हणून कार्यरत नाहीत, किंवा निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.

2. माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

advertisement

वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे आणि Submit बटणावर क्लिक करावे. सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर स्क्रीनवर ''Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे'' असा संदेश दिसेल.

या सोप्या प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांना सेतु कार्यालयात जाऊन रांग लावण्याची गरज नाही, वेळ वाचतो आणि घरबसल्या सहजपणे ई-केवायसी पूर्ण करता येते. त्यामुळे माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अधिक सुलभतेने आणि सुरक्षितपणे घेता येईल.

advertisement

मराठी बातम्या/देश/
Ladki Bahin Yojana e-KYC : लाडक्या बहिणींनो सेतु कार्यालयात रांग लावायची गरज नाही! घरबसल्या करा ई केवायसी, A TO Z माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल