TRENDING:

World War : तिसरं विश्वयुद्ध झालंच तर कोणते देश असतील सर्वात सुरक्षित? जाणून घ्या टॉप 10 यादी

Last Updated:

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे 'तिसऱ्या महायुद्धाची' (Third World War) चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. सोशल मीडियापासून ते चहाच्या टपरीपर्यंत एकच प्रश्न विचारला जातोय "जर खरोखरच अण्वस्त्र युद्ध झालं, तर मानवजात वाचणार का?"

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सध्या जगाच्या नकाशावर नजर टाकली तर चोहोबाजूला युद्धाचे ढग दाटलेले दिसतात. इस्रायल-हमास संघर्ष असो वा रशिया-युक्रेन युद्ध, गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे 'तिसऱ्या महायुद्धाची' (Third World War) चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. सोशल मीडियापासून ते चहाच्या टपरीपर्यंत एकच प्रश्न विचारला जातोय "जर खरोखरच अण्वस्त्र युद्ध झालं, तर मानवजात वाचणार का?"
AI Generated photo
AI Generated photo
advertisement

अशा भीषण परिस्थितीत जगातील काही देश मात्र त्यांच्या भौगोलिक रचनेमुळे किंवा तटस्थ धोरणामुळे हे देश महायुद्धाच्या आगीपासून दूर राहू शकतात. चला तर मग जाणून घेऊया, जगातील अशा 10 ठिकाणांबद्दल जे विनाशाच्या वेळीही सुरक्षित राहू शकतात.

स्वित्झर्लंड

जगातील सर्वात सुरक्षित देशांच्या यादीत स्वित्झर्लंडचे नाव नेहमीच अग्रस्थानी असते. याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांचे कोणत्याही युद्धात सामील न होण्याचे धोरण. याशिवाय, इथला डोंगराळ भूभाग अणुहल्ल्याच्या वेळी नैसर्गिक संरक्षणाचं काम करतो. स्वित्झर्लंडमध्ये तर प्रत्येक नागरिकासाठी 'न्यूक्लियर बंकर'ची सोय असल्याचेही म्हटले जाते.

advertisement

सिंगापूर

आशिया खंडात सिंगापूर हे एक असं ठिकाण आहे जे युद्धकाळात सुरक्षित मानलं जातं. या देशाची भौगोलिक रचना आणि प्रगत संरक्षण प्रणाली त्याला अण्वस्त्रांच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी सक्षम आहे.

आइसलँड आणि न्यूझीलंड

हे दोन्ही देश मुख्य भूमीपासून हजारो मैल दूर बेटांवर वसलेले आहेत. अण्वस्त्र युद्धाच्या वेळी होणारे 'रेडिएशन' (विकिरण) इतक्या लांबवर पोहोचण्याचा धोका कमी असतो. न्यूझीलंड तर त्याच्या सुपीक जमिनीमुळे अन्नपुरवठ्यासाठीही स्वयंपूर्ण आहे.

advertisement

ग्रीनलँड

ग्रीनलँड हा जगातील सर्वात विरळ लोकसंख्येचा भाग आहे. तिथली दुर्गम स्थिती आणि राजकीय तटस्थता यामुळे हा देश कोणत्याही देशाच्या हिटलिस्टवर नसतो. कडाक्याची थंडी आणि भौगोलिक स्थान या देशाला युद्धापासून दूर ठेवते.

भूतान

भारताचा शेजारी देश भूतान हा चारही बाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला आहे. अण्वस्त्र युद्धाच्या काळात भूतानसारख्या 'लँडलॉक्ड' देशावर हल्ला होण्याची शक्यता नगण्य असते. इथली शांतताप्रिय संस्कृती देखील संरक्षणाचे काम करते.

advertisement

फिजी आणि ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियाच्या मुख्य भूमीपासून 2,700 मैल दूर असलेले फिजी हे बेट घनदाट जंगलांनी नटलेले आहे. अलिप्त असल्यामुळे हे एक सुरक्षित आश्रयस्थान ठरू शकते. ऑस्ट्रेलिया देखील आपल्या विशाल भूभागामुळे अण्वस्त्र युद्धाच्या रेडिएशनपासून वाचू शकतो, विशेषतः तिथला ग्रामीण भाग.

अंटार्क्टिका

जगाच्या सर्वात दक्षिणेला असलेला हा खंड केवळ बर्फाचा डोंगर आहे. अवाढव्य भूभाग आणि अतिशय कमी लोकसंख्या असल्यामुळे, कोणत्याही लष्करी शक्तीला इथे अण्वस्त्र डागण्यात रस नसतो.

advertisement

एंग्लेसी आणि कॉर्नवाल

वेल्सच्या किनाऱ्यावरील 'एंग्लेसी' हे बेट आणि इंग्लंडमधील 'कॉर्नवाल' हा ग्रामीण भाग त्यांच्या भौगोलिक स्थानामुळे सुरक्षित मानले जातात. कॉर्नवालमधील खडकाळ किनारपट्टी आणि खोल दऱ्या अण्वस्त्रांच्या प्रभावाला रोखण्यासाठी प्रभावी ठरू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शाहरूख अन् सलमान खानला पाहायचं? फक्त 50 रुपयांत होईल 'भेट', वांद्र्यात फिरण्याचा
सर्व पहा

युद्धाची भीषणता कोणालाच नको हवी आहे, पण जर जगावर अशी वेळ आलीच तर दक्षिण अमेरिकेतील चिली, उरुग्वे आणि अर्जेंटिना हे देशही सुरक्षित मानले जातात.

मराठी बातम्या/देश/
World War : तिसरं विश्वयुद्ध झालंच तर कोणते देश असतील सर्वात सुरक्षित? जाणून घ्या टॉप 10 यादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल