भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर भारतीय हवाई दलाच्या ट्वीटने पुन्हा एकदा पाकिस्तानच्या मनात धडकी भरण्याची चिन्हे आहेत. भारतीय हवाई दलाने स्पष्ट केले की त्यांचे ऑपरेशन अद्याप संपलेले नाही. भारतीय हवाई दलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'भारतीय हवाई दलाने (IAF) ऑपरेशन सिंदूरमध्ये नेमून दिलेली कामे अचूकता आणि व्यावसायिकतेने यशस्वीरित्या पार पाडली आहेत. राष्ट्रीय उद्दिष्टांच्या अनुषंगाने हे ऑपरेशन विचारपूर्वक आणि विवेकपूर्णपणे पार पाडण्यात आले. ऑपरेशन अजूनही सुरू असल्याने, सविस्तर माहिती वेळोवेळी दिली जाईल. आयएएफ सर्वांना अपील करते की नागरिकांनी खोट्या माहितीचा प्रसार टाळावा.
advertisement
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान चांगलाच बिथरला असल्याचे दिसून आले. पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले करण्यास सुरुवात केली. मात्र, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे हे हल्ले परतवून लावले. भारताच्या हवाई संरक्षण प्रणालींनी चांगलीच भूमिका या कामी बजावली. पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्याला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, भारतीय लष्कराच्या तिन्ही प्रमुखांची बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरू आहे. रविवारी तिन्ही लष्करप्रमुख लढाऊ पोशाखात पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी पोहोचले. युद्धबंदीनंतर पाकिस्तानविरुद्ध पुढील पावले उचलण्याचा निर्णय घेतला जाईल अशी चर्चा सुरू आहे.