दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या 6E509 विमानाला आज पाटणामधील जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर लगेचच इमर्जन्सी लॅण्डिंग करावं लागलं. पक्षी धडकल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. विमानात 169 प्रवासी होते आणि ते सर्व सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. विमान सकाळी 9:03 वाजता व्यवस्थित लॅण्ड झाल्याचं सांगितलं जात आहे.
advertisement
विमान उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच. एअर ट्रॅफिक कंट्रोलला विमान कर्मचाऱ्यांकडून संदेश मिळाला की, एका इंजिनमध्ये काहीतरी अडचण असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर तातडीनं पटना इथे इमर्जन्सी लॅण्डिंगची परवानगी घेतल्यानंतर विमान सुरक्षितपणे लॅण्ड करण्यात आलं. पायलटने घेतलेल्या या निर्णयामुळे पुढचा धोका टळला. विमानाची तपासणी केल्यानंतर मृत पक्षाचे अवशेष सापडले. पक्षी धडकल्याने हा संपूर्ण प्रकार घडल्याचं समोर आलं.
इंडिगो अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. विमान कंपनीने झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला असून, प्रवाशांना नाश्ता दिला जात आहे आणि विमानाबद्दल नियमित अपडेट्स दिले जात आहेत. मागच्या महिन्यात देखील अशीच एक घटना भुवनेश्वरहून कोलकाताला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाबाबत घडली होती. ज्यामुळे उड्डाण रद्द करण्याची वेळ इंडिगोवर आली.