TRENDING:

इराण युद्धाचा थेट फटका तुमच्या 'MRI' ला? भारताची आरोग्य सेवा धोक्यात; काय आहे War चं 'मेडिकल' कनेक्शन?

Last Updated:

आता तुम्हाला वाटेल की हेलियमचा आणि सामान्य माणसाचा काय संबंध? तो माहाग झाला तर आपल्याला काय फरक पडणार? पण हाच तो वायू आहे ज्याच्याशिवाय हॉस्पिटलमधील MRI (Magnetic Resonance Imaging) मशिन चालूच शकत नाहीत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : इराण आणि युएस यांच्यातील युद्धाचा फटका भारतच नाही तर संपूर्ण जगाला पडला आहे. यांच्यातील वाढत्या संघर्षाचे पडसाद आता केवळ पेट्रोल-डिझेलच्या किमतीपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. इराणने कतारच्या ऊर्जा प्रकल्पांवर केलेल्या हल्ल्यामुळे जागतिक स्तरावर 'हेलियम' Helium वायूचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. ज्यामुळे त्याचा परिणाम हेलियम गॅसच्या सप्लायवर झाला आहे.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

आता तुम्हाला वाटेल की हेलियमचा आणि सामान्य माणसाचा काय संबंध? तो माहाग झाला तर आपल्याला काय फरक पडणार? पण हाच तो वायू आहे ज्याच्याशिवाय हॉस्पिटलमधील MRI (Magnetic Resonance Imaging) मशिन चालूच शकत नाहीत.

MRI आणि हेलियमचे नेमके कनेक्शन काय?

MRI मशिनमध्ये अतिशय शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र तयार करण्यासाठी सुपरकंडक्टिंग मॅग्नेटचा वापर केला जातो. हे मॅग्नेट प्रचंड गरम होतात. त्यांना थंड ठेवण्यासाठी उणे 269 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची गरज असते, जी केवळ द्रवरूप हेलियमदेऊ शकतो. मग अशात तर हेलियम गॅसच भारतात आला नाही तर याचे परिणाम मेडिकल क्षेत्रावर देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

advertisement

युद्धाचा फटका भारतातील मेडिकल सेवांवर कसा होणार?

कतार हा जगातील हेलियमचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. तो जागतिक पुरवठ्याचा 1/3 हिस्सा प्रोड्यूस करतो. इराणच्या हल्ल्यामुळे कतारमधील हेलियम उत्पादनात 14% घट झाली आहे. त्यामुळे जगभरातील हेलियम पुरवठ्यात 5% तूट निर्माण झाली आहे. जर हे युद्ध लांबले, तर हेलियमचा तुटवडा निर्माण होऊन MRI स्कॅनिंगच्या सेवा महागू शकतात किंवा काही काळ बंद देखील पडू शकतात. त्यामुळे आता कच्च्या तेलाप्रमाणेच हेलियमच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट भार रुग्णांच्या खिशावर पडू शकतो.

advertisement

केवळ मेडिकलच नाही, तर 'चिप' निर्मितीवरही संकट

हेलियमचा वापर केवळ MRI साठीच नाही, तर मोबाईल आणि कॉम्प्युटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या 'सेमीकंडक्टर चिप्स' तयार करण्यासाठीही केला जातो. कतारमधून तैवानला होणारा 60% हेलियम पुरवठा धोक्यात आल्याने भविष्यात मोबाईल, लॅपटॉप आणि एआय (AI) उपकरणांच्या किमतीही वाढू शकतात.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रस्त्यावर पैसे मागितले, पण शेवटी ठरवलं अन् ट्रान्सजेंडर मनस्वीनं करून दाखवलं, VIDEO
सर्व पहा

इराण आणि अमेरिकेतील हे युद्ध आता केवळ सीमेपुरते मर्यादित राहिलेले नाही. कतारमधील गॅस प्रकल्पांवर झालेले हल्ले हे जागतिक आरोग्य यंत्रणेसाठी धोक्याची घंटा आहेत. जर लवकरच शांतता प्रस्थापित झाली नाही, तर रुग्णालयातील महत्त्वाच्या चाचण्यांसाठी लागणारा हा 'अदृश्य' वायू शोधण्याची वेळ जगावर येईल.

advertisement

मराठी बातम्या/देश/
इराण युद्धाचा थेट फटका तुमच्या 'MRI' ला? भारताची आरोग्य सेवा धोक्यात; काय आहे War चं 'मेडिकल' कनेक्शन?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल