TRENDING:

IRCTC : रेल्वेचं जबरदस्त एक्शन प्लान, 3 कोटींहून अधिक बनावट युजर आयडी ब्लॉक, आता कन्फर्म तिकिट मिळणं आणखी सोपं

Last Updated:

रेल्वे मंत्रालयाने ऑनलाइन तिकीट बुकिंग प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सामान्य प्रवाशांसाठी अनुकूल बनवण्यासाठी मोठे आणि कठोर पाऊल उचलले आहेत. या उपाययोजनांमुळे आता कन्फर्म तत्काळ तिकीट मिळण्याची शक्यता 65 टक्क्यांनी वाढली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारतीय रेल्वे हा देशातील लाखो लोकांसाठी प्रवासाचा आधार आहे. लांबच्या किंवा अगदी जवळच्या प्रवासासाठी देखील लोक रेल्वेचा वापर करतात. कारण ती वेळेवर पोहोचवते शिवाय त्यासाठी खर्च देखील कमी येतो. पण अनेकदा, जेव्हा अचानक प्रवासाला निघायचे असते, तेव्हा सर्वात मोठी समस्या उभी राहते ती म्हणजे 'तत्काळ' तिकीट बुकिंग (Tatkal Ticket Booking) मिळण्याची. कारण अनेकदा कितीही प्रयत्न केले तरी देखील लोकांचे तत्काळ तिकिट बुक होत नाही. कधीकधी वेळ सुरु होताच तिकिट काढायला घेतलं तरी देखील 'नो सीट' (No Seat) चा पर्याय दिसतो. अशावेळी लोकांना खूप राग येतो आणि ही सर्विस काही कामाची नाही असं वाटतं.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

या सगळ्या त्रासाला कंटाळलेल्या प्रवाशांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने ऑनलाइन तिकीट बुकिंग प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सामान्य प्रवाशांसाठी अनुकूल बनवण्यासाठी मोठे आणि कठोर पाऊल उचलले आहेत. या उपाययोजनांमुळे आता कन्फर्म तत्काळ तिकीट मिळण्याची शक्यता 65 टक्क्यांनी वाढली आहे.

1. बनावट आयडी ब्लॉक

तिकिटांची काळाबाजारी आणि बनावट बुकिंग करणाऱ्यांना रेल्वेने मोठा धक्का दिला आहे.

advertisement

जानेवारी 2025 पासून आतापर्यंत रेल्वेने सुमारे 3.02 कोटींहून अधिक संशयास्पद किंवा बनावट युजर आयडी बंद (Deactivate) केले आहेत. या बोगस आयडीचा वापर ऑटोमेटेड सॉफ्टवेअर आणि अनधिकृत एजंट्स (Agents) तिकीट बुकिंगसाठी करत होते. या आयडीजवर कठोर कारवाई केल्यामुळे, खरा प्रवासी आता सहजपणे तिकीट बुक करू शकणार आहे.

1. 'ॲन्टी-बॉट सिस्टम' आणि 'आधार'चे कवच

advertisement

ऑनलाइन बुकिंगमध्ये मानवी हस्तक्षेपाशिवाय तिकीट बूक करणाऱ्या बॉट्सना रोखण्यासाठी रेल्वेने प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

रेल्वेने तत्काळ बुकिंगमध्ये 'ॲन्टी-बॉट सिस्टीम' (जसे की AKAMAI सारखे सोल्यूशन्स) लागू केले आहे. हे तंत्रज्ञान ऑटोमेटेड स्क्रिप्ट्स आणि बॉट्सना बुकिंग विंडोवर वर्चस्व गाजविण्यापासून थांबवते आणि केवळ वास्तविक युजर्सनाच तिकीट बुक करण्याची संधी मिळते.

गैरवापर रोखण्यासाठी रेल्वेने आधार-आधारित OTP (One-Time Password) पडताळणी अनिवार्य केली आहे.

advertisement

322 हून अधिक लोकप्रिय गाड्यांमध्ये ऑनलाइन तत्काळ तिकीट बुकिंगसाठी OTP अनिवार्य करण्यात आला आहे. (सूत्रांनुसार, जुलै २०२५ पासून ऑनलाइन तत्काळ बुकिंगसाठी आधार अनिवार्य करण्यात आले आहे.)

केवळ ऑनलाइनच नाही, तर देशभरातील आरक्षण काउंटरवरही 211 गाड्यांमध्ये ही OTP पडताळणी प्रक्रिया लागू करण्यात आली आहे.

3. थेट फायदा सामान्य प्रवाशाला

या कठोर उपायांमुळे सामान्य प्रवाशांना थेट लाभ मिळत आहे. 96 सर्वाधिक मागणी असलेल्या (Popular) गाड्यांपैकी 95% गाड्यांमध्ये आता तत्काळ तिकीट उपलब्ध राहण्याचा कालावधी वाढला आहे. यामुळे प्रवाशांना आता एजंट्स किंवा कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय तिकीट मिळवण्याची अधिक चांगली आणि पारदर्शक संधी मिळाली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुळाची झाली भाव वाढ, केळी आणि आल्याची आज काय स्थिती? Video
सर्व पहा

भारतीय रेल्वेचे हे डिजिटल सुधारणांचे पाऊल प्रवाशांच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तिकीट बुकिंगची प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित, पारदर्शक आणि वापरकर्ता-अनुकूल करणे हे रेल्वेचे लक्ष्य आहे.

मराठी बातम्या/देश/
IRCTC : रेल्वेचं जबरदस्त एक्शन प्लान, 3 कोटींहून अधिक बनावट युजर आयडी ब्लॉक, आता कन्फर्म तिकिट मिळणं आणखी सोपं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल