TRENDING:

जगदीप धनखड कुठे आहेत? काय करतायत? अखेर लागला सुगावा, माजी उपराष्ट्रपतींबाबत मोठी अपडेट

Last Updated:

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या मौनाबद्दल आणि सार्वजनिक जीवनातून गायब होण्याबद्दल विविध अंदाज व्यक्त केले जात होते. पण सध्या धनखड कुठे आहेत, ते काय करत आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे सापडली आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. धनखड यांच्या अचानक राजीनाम्याने सर्वांनाच धक्का बसला. विरोधी पक्षांनी प्रथम त्यांच्या राजीनाम्याच्या कारणाबद्दल प्रश्न उपस्थित केले, नंतर सार्वजनिक जीवनातून त्यांच्या गायब होण्याबद्दल शंका उपस्थित केली. २१ जुलै रोजी राजीनामा दिल्यापासून धनखड ना त्यांच्या अधिकृत कार्यालयात गेले, ना उपराष्ट्रपती म्हणून त्यांच्याकडे असणाऱ्या ताफ्याचा वापर केला. धनखड यांच्या मौनाबद्दल आणि सार्वजनिक जीवनातून गायब होण्याबद्दल विविध अंदाज व्यक्त केले जात होते. पण सध्या धनखड कुठे आहेत, ते काय करत आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे सापडली आहेत.
प्रातिनिधीक फोटो
प्रातिनिधीक फोटो
advertisement

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, जगदीप धनखड हे दिल्लीत त्यांना मिळालेल्या सरकारी निवासस्थानी आरामदायी जीवन जगत आहेत. १५ एकरांवर पसरलेल्या या उच्च सुरक्षा असलेल्या निवासस्थानी धनखड सकाळी योगा करतात आणि संध्याकाळी टेबल टेनिस खेळतात. त्यांच्या कन्या कामना वाजपेयी जवळजवळ दररोज गुरुग्रामहून त्यांना भेटायला येतात.

व्यवसायाने वकील असलेले धनखर हे सध्या राजकारण आणि न्यायालयीन प्रकरणांवर आधारित वेब सीरीज पाहण्यात वेळ घालवत आहेत. ते आजकाल ओटीटीवर 'द लिंकन लॉयर' आणि 'हाऊस ऑफ कार्ड्स' मालिका पाहत असल्याची माहिती समोर आली आहे.

advertisement

सरकारी वाहनं वापरणं केलं बंद

वृत्तपत्रानुसार, धनखड यांची पत्नी सुदेश धनखड यांनी गेल्या एका महिन्यात किमान तीन वेळा राजस्थानला भेट दिली. यापैकी दोनदा त्या रस्त्याने जयपूरला गेल्या, जिथे तिच्या कुटुंबाच्या जमिनीवर दोन व्यावसायिक संकुलांचे बांधकाम सुरू आहे. याच कामाची पाहणी करण्यासाठी त्या राजस्थानला गेल्या.

सुदेश यांनी या भेटींमध्ये सरकारी वाहने वापरली नाहीत आणि अलीकडेच खरेदी केलेल्या कुटुंबाच्या कारमधून त्यांनी प्रवास केला. स्थानिकांच्या मते, यापूर्वी या भेटींमध्ये एक मोठा ताफा येत असे, परंतु धनखड यांच्या राजीनाम्यानंतर वाहनांची संख्या बरीच कमी झाली आहे.

advertisement

धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर, या दाम्पत्याने लगेचच सामान बांधायला सुरुवात केली. सध्या ते सरकार त्यांना नवीन घर अलॉट करण्याची वाट पाहत आहेत. एकदा त्यांना बंगला मिळाला की, त्यांना माजी उपराष्ट्रपतींना मिळणाऱ्या सर्व सुविधा मिळतील, ज्यामध्ये कार आणि सुरक्षा रक्षकांचा समावेश असेल.

मराठी बातम्या/देश/
जगदीप धनखड कुठे आहेत? काय करतायत? अखेर लागला सुगावा, माजी उपराष्ट्रपतींबाबत मोठी अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल