टाईम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, आरोपीने पाटणा उच्च न्यायालयात जामीन मागितला होता, पण हायकोर्टाने कनिष्ठ न्यायालयात हे प्रकरण पाठवलं, त्यानंतर आरोपीने कनिष्ठ न्यायालयात लग्नाची परवानगी मागितली. लग्नाची परवानगी मिळाल्यानंतर तुरुंग अधिकाऱ्यांनी जेलमध्येच लग्न समारंभ आयोजित केला.
न्यायालयाच्या आदेशानुसार लग्न
तुरुंग अधीक्षक ओम प्रकाश शांती भूषण यांनी सांगितले की, न्यायालयाच्या आदेशानुसार लग्न पार पडले. न्यायाधीश सय्यद मोहम्मद फजलुल बारी यांच्या निर्देशानुसार, मधुबनी विभागीय तुरुंगाने त्यांच्या आवारातच हा विवाह सोहळा आयोजित केला. लग्न समारंभ पाहण्यासाठी वकील, कुटुंबातील सदस्य आणि तुरुंग कर्मचारी उपस्थित होते तर कैदी "बाराती" म्हणून उपस्थित होते.
advertisement
काय आहे प्रकरण?
छोटू यादव उर्फ बद्री यादव आणि गीता कुमारी यांच्याशी संबंधित हे प्रकरण आहे. 2022 मध्ये गीताचा पती, जो छोटू यादवचा मोठा भाऊ आहे, त्याचं निधन झालं. पतीच्या मृत्यूनंतर गीताची जवळीक छोटूसोबत वाढली आणि दोघं एकत्र राहू लागले. यानंतर छोटूने गीतावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले, यात गीता अनेकवेळा गर्भवती राहिली, पण तिने गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या. काही काळानंतर गीताने गर्भपात करायला नकार दिला, त्यानंतर छोटू यादवने तिच्यावर अत्याचार करायला सुरूवात केली.
स्वतःचे आणि पोटातल्या बाळाचे रक्षण करण्यासाठी गीताने छोटूविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर छोटू यादवला न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आले. अटकेनंतर छोटू यादवने जामीन अर्ज दाखल केला, जो गीतासोबत लग्न केल्यानंतरच मंजूर झाला. त्यानंतर गीता आणि छोटू यांचं लग्न तुरुंगाच्या आवारात पार पडलं.
तुरुंग कर्मचारी आणि कुटुंबातील सदस्यांनी साक्षीदार म्हणून उपस्थित राहून पारंपारिक विधी पूर्ण केले. हा समारंभ पूर्णपणे मधुबनी विभागीय तुरुंगाच्या देखरेखीखाली आयोजित करण्यात आला होता. आरोपीचे वडील जयनारायण यादव, काकू कौशल्या देवी, वकील विजय कुमार भारती आणि नितेश गुप्ता आणि जेलर रामविलास दास उपस्थित होते.