सिवान, 13 ऑगस्ट : आपल्याला जरासं दुखलं, खुपलं की, प्रश्न पडतो आता मी काय करू. आपण आपल्या एकाही अवयवाशिवाय जगण्याचा विचारही करू शकत नाही. परंतु काही व्यक्ती मात्र जन्मतःच खास असतात आणि ते तसंच आयुष्य जगतात. झारखंडच्या बोकारो भागातील माणिक चंद देखील त्यापैकीच एक. जन्मतःच अंधत्व येऊनही आपण हे जग पाहूच शकत नाही, तर त्यात करू तरी काय शकतो, असा विचार त्यांनी केला नाही. तर, मोठ्या जिद्दीने ते रेल्वेची परीक्षा उत्तीर्ण झाले. शिवाय आता शिक्षक होऊन मुलांना शिकवायचं, हे त्यांचं स्वप्न आहे.
advertisement
सरकारी नोकरीसाठी अनेक तरुण वर्षानुवर्षे अभ्यास करतात. माणिक यांनीही यासाठी प्रचंड मेहनत घेतली. अखेर त्यांच्या मेहनतीला यश मिळालं. रेल्वेच्या ग्रुप डी परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. त्यांचे वडील चुरामन राम हे पेशाने बाईक मेकॅनिक आणि आई गीता देवी या गृहिणी आहेत. मुलाच्या यशस्वी कामगिरीबाबत दोघंही आनंदात आहेत.
या दोन दिव्यांग तरुणांच्या जिद्दीला खरंच सलाम! मेहनतीचं मिळालं फळ, आता भारतीय संघात निवड
माणिक चंद यांनी हरमूमध्ये नेत्रहीन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शाळेतून इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर दिल्लीच्या सादिक नगरातील जनता आदर्श विद्यालयातून ते दहावी उत्तीर्ण झाले. पुढे दिल्लीच्या सर्वोदय बाल विद्यालयातून बारावीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर दिल्लीतच करोडीमल महाविद्यालयात हिंदी विषयातून ते पदवीधर झाले. स्वामी श्रद्धानंद महाविद्यालयातून त्यांनी पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. इतकंच नाही, तर महर्षी वाल्मिकी महाविद्यालयातून त्यांनी बीएडचं शिक्षणदेखील घेतलं.
सुनेसाठी सासूच ठरली लाईफ लाईन, किडनी देऊन दिला नवा जन्म, Video
माणिक दिल्लीत असताना हॉस्टेलमध्ये राहायचे. तिथे त्यांचे काही मित्र स्पर्धा परीक्षांची तयारी करायचे, त्यांच्याच साथीला माणिकदेखील हा अभ्यास करू लागले. तेव्हाच त्यांनी रेल्वे भरतीची परीक्षा द्यायचं ठरवलं. त्यांनी इंस्टा रीडर मोबाईल अॅपवरून हा अभ्यास सुरू केला. शिवाय ब्रेन लिपी वरदान ठरली, असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, अडचणीच्या परिस्थितीत कोणीही निराश होऊ नये. एक ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायचे, मग यश निश्चितच मिळतं. लक्षात घ्या, प्रत्येक रात्रीनंतर दिवस हा उजाडतोच. त्यामुळे कोणतीही अडचण आपल्या ध्येयाच्या मार्गतला अडथळा बनू शकता नाही.'