या दोन दिव्यांग तरुणांच्या जिद्दीला खरंच सलाम! मेहनतीचं मिळालं फळ, आता भारतीय संघात निवड
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
देशाच्या अनेक भागात ते क्रिकेट खेळायला जाऊन आलेले आहेत. आता त्यांची निवड ही भारतीय संघात झाली आहे.
शाश्वत सिंह, प्रतिनिधी
झाशी, 12 ऑगस्ट : जर मनात जिद्द असेल तर तुमच्यासाठी काहीही अशक्य नाही, असे दोन दिव्यांग तरुणांनी सिद्ध केले आहे. झाशी येथील दोन दिव्यांग क्रिकेटपटूंची निवड भारताच्या व्हीलचेअर संघात झाली आहे. झाशीच्या राहणाऱ्या ईश्वरी चौधरी आणि अरविंद जोशी अशी या दोघांची नावे आहेत. ते मागील 10 वर्षांपासून व्हीलचेअर क्रिकेट खेळत आहेत.
advertisement
देशाच्या अनेक भागात ते क्रिकेट खेळायला जाऊन आलेले आहेत. आता त्यांची निवड ही भारतीय संघात झाली आहे. हे दोन्ही क्रिकेटपटू मलेशियामध्ये होणाऱ्या चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाचा भाग म्हणून खेळणार आहेत. या दोघांची कहाणी ही प्रत्येकांसाठी खूप प्रेरणादायी आहे.
ईश्वरी चौधरी याने सांगितले की, तो जन्मापासूनच दिव्यांग होता. जेव्हा तो 6 महिन्यांचा होता जेव्हा त्याला पोलिओ झाला आहे, असे त्याच्या पालकांना कळले. यानंतर त्याला अनेक ठिकाणी उपचारासाठी घेऊन जाण्यात आले, मात्र, तरीसुद्धा तो बरा झाला नाही. यानंतर, तो लहान-मोठे कामं करण्यात गुंतला आणि स्टेडियममध्ये येऊन क्रिकेट खेळायचा प्रयत्न करु लागला. दरम्यान, त्याची आवड आणि कौशल्याने प्रेरित होऊन एका व्यक्तीने त्याला व्हीलचेअर क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून त्याचा प्रवास सुरू झाला आणि आज त्याने भारतीय संघात स्थान मिळवले आहे.
advertisement
क्रिकेटने दिली पुन्हा उमेद -
तर अरविंद जोशी याची कहाणीसुद्धा अशीच आहे. तो जेव्हा 5 वर्षांचा होता, तेव्हा त्याला एक आजार झाला आणि त्याचे पालक त्याला रुग्णालयात घेऊन गेले. याठिकाणी त्याच्यासोबत एक धक्कदायक घटना घडली. रुग्णालयात चुकीचे इंजेक्शन दिले गेल्याने त्यांच्या शरीराचा खालच्या भागाने काम करणे बंद केले. या संपूर्ण प्रकाराने तो खूप निराश झाला होता.
advertisement
मात्र, काही काळ गेल्यावर त्याने हळूहळू पुन्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याने सतत मेहनत केली आणि आज त्याची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली आहे. आगामी मलेशिया चॅम्पियनशिपमध्येही तो सहभागी होणार आहे. ईश्वरी चौधरी आणि अरविंद जोशी या दोन्ही खेळाडूंची कहाणी ही आजच्या तरुणाईला नक्कीच प्रेरणादायी आहे.
view commentsLocation :
Uttar Pradesh
First Published :
August 12, 2023 9:44 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
या दोन दिव्यांग तरुणांच्या जिद्दीला खरंच सलाम! मेहनतीचं मिळालं फळ, आता भारतीय संघात निवड


