आरोग्याचे कारण देऊन राजीनामा दिलेले मावळते उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार कोण असणार, याकडे अनेकांचे लक्ष होते. गेल्या दोन आठवड्यांपासून नव्या उमेदवाराच्या शोधासाठी भाजपने वेळ घेतला. दरम्यानच्या काळात विविध राजकीय समीकरणे डोळ्यासमोर ठेवून अनेक राज्यातील ज्येष्ठ नेत्यांचा उपराष्ट्रपतीपदासाठी विचार झाला. अखेर सीपी राधाकृष्णन यांचे नाव उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून उमेदवार समितीचे प्रमुख जेपी नड्डा यांनी जाहीर केले.
advertisement
सीपी राधाकृष्णन यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची भेट घेतली होती
अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे सीपी राधाकृष्णन यांनी ११ ऑगस्टला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची भेट घेतली होती. सीपी राधाकृष्णन हे मूळचे तामिळनाडूचे आहेत, त्यामुळे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सीपी राधाकृष्णन यांनी ही भेट घेतल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. काही आठवड्यांपूर्वी एमके स्टॅलिन हे रुग्णालयात होते. स्टॅलिन यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेतल्याचे सीपी राधाकृष्णन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले होते.
डीएमके सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देणार का?
सीपी राधाकृष्णन हे तामिळनाडूचे असल्यामुळे इंडिया आघाडीमध्ये असलेली स्टॅलिन यांची डीएमके एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
कोण आहेत सी.पी. राधाकृष्णन?
सी. पी. राधाकृष्णन हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत
आधी त्यांनी झारखंडचे राज्यपालपद भूषवले
सी. पी. राधाकृष्णन हे तामिळनाडू राज्यातील आहेत
कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोन वेळा लोकसभा खासदारही राहिले
तसेच तामिळनाडू राज्याचे भारतीय जनता पक्षाचे ते माजी प्रदेशाध्यक्ष देखील होते