हेलिकॉप्टर नोडल अधिकारी राहुल चौबे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी हेलिकॉप्टर अपघाताची पुष्टी केली आहे. गौरीकुंडवर गवत कापणाऱ्या नेपाळी वंशाच्या महिलांनी हेलिकॉप्टर अपघाताची माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.
7 जण ठार, मृतांमध्ये महाराष्ट्रातील 2 जण
अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह 7 जण होते. दु्र्देवाने या अपघातात एकजण बचावला नाही. स्थानिक प्रशासनाने मृतांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. यामध्ये एका चिमुकलीचाही समावेश आहे.
advertisement
मृतांची नावे पुढीलप्रमाणे...
1. कॅप्टन राजबीर सिंग चौहान - पायलट (जयपूर)
2. विक्रम रावत बीकेटीसी रहिवासी रासी उखीमठ
3. विनोद देवी रा.उत्तर प्रदेश वय 66
4. तृष्टी सिंग उत्तर प्रदेश वय 19 वर्षे
5. राजकुमार सुरेश रा.गुजरात वय 41 वर्षे - महाराष्ट्र
6. श्रद्धा राजकुमार जयस्वाल रा.महाराष्ट्र
7. काशी, रा. महाराष्ट्र मुलगी वय 02 वर्षे
आजच्या अपघातानंतर केदारनाथ धामची हेलिकॉप्टर सेवा रद्द करण्यात आली आहे.
हेलिकॉप्टरचा यापूर्वीदेखील अपघात...
या चारधाम यात्रेदरम्यान वेगवेगळ्या धामांवर हेलिकॉप्टर कोसळले आहेत. तसेच हेलिकॉप्टरचे अनेक वेळा आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. अलिकडेच रस्त्याच्या मधोमध एक हेलिकॉप्टर कोसळले होते. चारधाम यात्रेच्या सुरुवातीला एक हेलिकॉप्टरही एकदा कोसळले होते, ज्यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला होता.