TRENDING:

Seat 11A in Flight : विमानातली लकी सीट क्रमांक 11A, तुम्हाला हवी तर पूर्ण करावी लागेल ही अट...

Last Updated:

Rules for sitting on lucky seat number 11A in flight: विमान अपघातानंतर 11A या सीटची मागणी चांगली वाढली आहे. मात्र, तुमची इच्छा असली तरी सरसकट सगळ्यांनाच ही सीट मिळत नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Lucky Seat Number 11A in Flight:  अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलाइनर विमान टेकऑफनंतर काही सेकंदातच कोसळले. या अपघातात सुमारे 2769 लोकांचा मृत्यू झाला. या अपघात 241 प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा समावेश होता. या अपघातात विश्वास रमेश कुमार नावाचा फक्त एक प्रवासी चमत्कारिकरित्या वाचला आणि हा प्रवासी विमानाच्या 11A या क्रमांकाच्या आसनावर तो होता.
विमानातली लकी सीट क्रमांक 11A, तुम्हाला हवी तर पूर्ण करावी लागेल ही अट...
विमानातली लकी सीट क्रमांक 11A, तुम्हाला हवी तर पूर्ण करावी लागेल ही अट...
advertisement

यापूर्वी, 1998 च्या थाई एअरवेजच्या विमान अपघातात फक्त एकच प्रवासी वाचला आणि तो विमानाच्या 11A क्रमांकाच्या सीटवर बसला होता. विमान अपघातानंतर 11A या सीटची मागणी चांगली वाढली आहे. मात्र, तुमची इच्छा असली तरी सरसकट सगळ्यांनाच ही सीट मिळत नाही. ही सीट मिळवण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात.

सर्वजण 11A क्रमांकाच्या सीटवर का बसू शकत नाहीत?

advertisement

बोईंग 787 ड्रीमलायनर विमानातील सीट क्रमांक 11A ही इकॉनॉमी सीटसोबतच आपत्कालीन सीट आहे. ही सीट विमानाच्या आपत्कालीन मार्गाजवळ असते. या सीटवर बसलेल्या प्रवाशांना विशेष जबाबदारीदेखील असते. या सीटवर प्रत्येकजण बसू शकत नाही. आपत्कालीन सीटबाबत काय नियम आहेत आणि कोणत्या प्रवाशांना ही सीट दिली जावी, याचे काही नियम आणि अटी आहेत.

advertisement

आपत्कालीन एक्झिट सीटचा मुख्य उद्देश आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आहे. जर काही कारणास्तव विमान लवकर रिकामे करावे लागले तर या सीटवर बसलेले प्रवासी क्रू मेंबर्सना मदत करतात. यासाठी, एअरलाइन्सनी काही कठोर नियम बनवले आहेत, जेणेकरून या सीटवर फक्त तेच लोक बसतील जे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम आहेत. तसेच, गरज पडल्यास ते क्रू मेंबर्सना मदत करू शकतात.

advertisement

आपत्कालीन सीटवर बसण्याचे नियम काय आहेत?

पहिला नियम असा आहे की प्रवासी किमान 15 वर्षांचा असावा. लहान मुलांना या सीटवर बसण्याची परवानगी नाही, कारण त्यांच्यात आपत्कालीन परिस्थितीत जलद निर्णय घेण्याची क्षमता असू शकत नाही. याशिवाय, प्रवासी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. जर एखादा प्रवासी अपंग असेल, गर्भवती असेल किंवा त्याला चालण्यास त्रास होत असेल तर त्याला या जागांवर बसण्याची परवानगी नाही.

advertisement

आपात्कालीन परिस्थितीमध्ये अन्य प्रवाशांची मदत करण्यास या सीटवरील प्रवासी सक्षम असावा, अशी अपेक्षा असते.

भाषादेखील महत्त्वाची?

आपत्कालीन सीट मिळविण्यासाठी भाषा ही देखील एक महत्त्वाची अट आहे. आपत्कालीन सीटवर बसलेल्या प्रवाशाला क्रूची भाषा, सहसा इंग्रजी किंवा त्या देशाची स्थानिक भाषा समजली पाहिजे. कारण आपत्कालीन परिस्थितीत क्रूच्या सूचना समजून घेणे आणि त्यांचे त्वरित पालन करणे महत्वाचे आहे. याशिवाय, प्रवासी मानसिकदृष्ट्या स्थिर असावा. जर एखादा प्रवासी मद्यधुंद असेल किंवा मानसिकदृष्ट्या अस्थिर असेल तर त्याला या सीटवर बसण्याची परवानगी नाही.

बऱ्याच वेळा प्रवासी अधिक लेगरूमसाठी आपत्कालीन सीट निवडतात, कारण या सीट सहसा अधिक प्रशस्त असतात. तथापि, एअरलाइन्स हे स्पष्ट करतात की या सीटवर बसणे ही सोय नसून जबाबदारी आहे. काही एअरलाइन्स यासाठी अतिरिक्त शुल्क देखील आकारतात, परंतु हे शुल्क फक्त नियमांचे पालन करणाऱ्या प्रवाशांकडूनच घेतले जाते.

भारतात आपत्कालीन जागांसाठी हा नियम आहे का?

इंडिगो, एअर इंडिया आणि स्पाइसजेट सारख्या सर्व भारतीय विमान कंपन्या देखील या नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) मार्गदर्शक तत्वांनुसार, क्रू मेंबर्सना खात्री करावी लागते की आपत्कालीन आसनावर बसलेला प्रवासी नियमांनुसार आहे. जर एखाद्या प्रवासी हा नियमात नसेल तर त्याला दुसऱ्या आसनावर बसवले जाते.

मराठी बातम्या/देश/
Seat 11A in Flight : विमानातली लकी सीट क्रमांक 11A, तुम्हाला हवी तर पूर्ण करावी लागेल ही अट...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल