आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 30 भाविकांचा मृत्यू झाला. 23 भाविक जखमी आहेत. सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
या घटनेची माहिती मिळताच भारतीय लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि इतर बचाव पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम दिवस-रात्र सुरू आहे. अनेक सरकारी आणि निमसरकारी यंत्रणा या बचावकार्यात सहभागी आहेत.
advertisement
जम्मू आणि काश्मीर सरकारने या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली असून, मदत आणि माहिती देण्यासाठी हेल्पलाइन डेस्क सुरू केला आहे. या हेल्पलाइन क्रमांकांवरून नागरिक आपल्या कुटुंबातील सदस्यांबद्दल माहिती मिळवू शकतात.
Location :
Jammu,Jammu,Jammu and Kashmir
First Published :
August 27, 2025 8:48 AM IST
मराठी बातम्या/देश/
वैष्णोदेवी यात्रेदरम्यान दरड कोसळून मोठी दुर्घटना, 30 भाविकांचा मृत्यू, IMD कडून हायअलर्ट