TRENDING:

'जैसे ज्याचे कर्म...' माजी सरन्यायधीश गवईंवर बूट फेकण्याच्या प्रयत्न करणाऱ्या राकेश किशोर यांना कोर्टातच चप्पलेनं हाणलं, VIDEO व्हायरल

Last Updated:

वकिलाच्या वेशात असलेल्या व्यक्तीने कोर्टात असे कृत्य केल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. पण, आता राकेश किशोर यांनाच कोर्टाच्या परिसरात चप्पलाने मारहाण करण्यात आली आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
माजी सरन्याधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलावर हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. वकील राकेश किशोर यांना कोर्टाच्या परिसरात चप्पलाने मारहाण करण्यात आली. यावेळी राकेश किशोर हे 'सनातन धर्म की जय' अशी घोषणाबाजी करत होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
News18
News18
advertisement

माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर कोर्टाच्या परिसरात वकील राकेश किशोर याने बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेमुळे देशभरात एकच खळबळ उडाली होती. वकिलाच्या वेशात असलेल्या व्यक्तीने कोर्टात असे कृत्य केल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. पण, आता राकेश किशोर यांनाच कोर्टाच्या परिसरात चप्पलाने मारहाण करण्यात आली आहे.

राकेश किशोर यांना मारहाण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना दिल्लीतील कडकडडूमा कोर्ट परिसरात घडली आहे. एक व्यक्ती हा अचानक राकेश किशोर यांना चप्पलाने मारहाण करत आहे. किशोर यांनी आपला बचाव करण्यासाठी उलट त्या माणसावर धावून गेले, आधी त्यांनी शिवी देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 'सनातन धर्म की जय' अशी घोषणाबाजी करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

advertisement

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.  न्यूज१८ मराठीने या व्हिडीओची पुष्टी केली नाहीये. या घटनेनंतर मात्र पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. कोर्टाच्या परिसरात असलेल्या इतर लोकांनी मध्यस्थी करून किशोर यांना  आणि चप्पलाने मारहाण करणाऱ्या व्यक्तीला बाजूला केलं. सध्या या प्रकरणी कुठेही तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोशल मीडियावरील ब्युटी टिप्स वापरताय? तर आताच थांबा ही सवय,डॉक्टरांनी दिला सल्ला
सर्व पहा

७१ वर्षांचे वकील राकेश किशोर यांनी ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान एका प्रकरणात माजी सरन्यायाधीश  बीआर गवई यांच्या दिशेनं बूट फेकण्याचं प्रयत्न केला होता. या प्रकरणी राकेश किशोर यांना निलंबित करण्यात आलं होतं.

मराठी बातम्या/देश/
'जैसे ज्याचे कर्म...' माजी सरन्यायधीश गवईंवर बूट फेकण्याच्या प्रयत्न करणाऱ्या राकेश किशोर यांना कोर्टातच चप्पलेनं हाणलं, VIDEO व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल