TRENDING:

LPG Crisis Update: भारतात गॅसची टंचाई का झाली? 5 महत्त्वाची कारणं समोर, सिलेंडर साठवणाऱ्यांना होणार जेल

Last Updated:

तरराष्ट्रीय परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असून त्याचा फटका छोट्या व्यवसायिकांना बसत आहे. विशेषतः हॉटेल व्यावयासिकांना याचा मोठा फटका बसला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
इराण आणि इस्त्रायल युद्धामुळे आता संपूर्ण जगभरात पडसाद उमटायला सुरुवात झाले आहे. भारतात आता प्रमुख शहरांमध्ये इंधन आणि गॅस टंचाईचा सामना करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असून त्याचा फटका छोट्या व्यवसायिकांना बसत आहे. विशेषतः हॉटेल व्यावयासिकांना याचा मोठा फटका बसला आहे. या सगळ्या घटनेवर केंद्र सरकारच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. भारतात तेल आणि गॅसचा पुरवठा हा पूर्णपणे स्थिर आहे, कुठेही टंचाई निर्माण होणार नाही. जर कुणी साठेबाजी करून ठेवत असेल तर जप्तीची कारवाई केली जाईल, असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे.
News18
News18
advertisement

नवी दिल्लीमध्ये पेट्रोलियम, शिपिंग आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन देशभरात कुठेही इंधन आणि गॅसची टंचाई नसून घाबरण्याचं काम नसल्याचं आवाहन केलं आहे. देशात 1,01,469 रिटेल पेट्रोल पंप आणि 25,605 एलपीजी डिस्ट्रीब्युटर सक्रिय आहेत. रोज सुमारे 50 लाख घरगुती एलपीजी सिलेंडरची डिलिव्हरी होत आहे. सध्या देशभरात 33.37 कोटी एलपीजी ग्राहक आहेत आणि उज्ज्वला योजनेअंतर्गत 10.56 कोटी कनेक्शन दिली गेली आहेत. तसंच खाडी भागात काम करणाऱ्या भारतीय नाविकांवर आणि तिथल्या जहाजांवरही सतत लक्ष ठेवलं जात आहे. नागरिकांनी  ऊर्जा पुरवठा आणि सुरक्षेवर पहिलं प्राधान्य देऊन भर दिला जात आहे.

advertisement

पत्रकार परिषदेतील ५ महत्त्वाचे मुद्दे

1. रोज 50 लाख सिलेंडरची डिलिव्हरी होत आहे. देशभरात इंधनाचा पुरवठा योग्य पद्धतीने सुरू आहे.  देशात 1,01,469 रिटेल पेट्रोल पंप आणि 25,605 एलपीजी डिस्ट्रीब्युटर सक्रिय आहेत. कुठल्याही भागात ड्राय आउटची स्थिती नाही. दररोज सुमारे 50 लाख घरगुती एलपीजी सिलेंडरची डिलिव्हरी केली जात आहे.  देशात एकूण 33.37 कोटी एलपीजी ग्राहक आहेत आणि पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत 10.56 कोटी कनेक्शन दिली गेली आहेत. तसंच 1.5 कोटींपेक्षा जास्त घरगुती पीएनजी कनेक्शनही आहेत.सर्व ग्राहकांना 100 टक्के पुरवठा सुरू आहे.

advertisement

2. मार्चमध्ये एलपीजी बुकिंग वाढली, सरासरीपेक्षा जास्त सिलेंडरची मागणी आहे,  इराण- इस्त्रायलच्या युद्धाच्या तणावााच्याा पार्श्वभूमीवर देशात एलपीजीची मागणी सतत वाढत आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मार्च 2026 मध्ये रोजची एलपीजी बुकिंग सरासरीपेक्षा जास्त आहे.  2 मार्चला सुमारे 71 लाख बुकिंग झाली. 10 मार्चला ही संख्या 69 लाख झाली. 12 मार्चला जवळपास 75.7 लाख बुकिंग झाली. सरासरी बुकिंग सुमारे 55.7 लाख असते. पण, आता मागणी वाढली आहे, असंही सरकारने माान्य केलं असून पुरवठा हा सामान्यपणे सुरू आहे.

advertisement

साठेबाजांवर होणार कारवाई

3. एलपीजी साठवणुकीवर सरकारने कडक कारवाई केली आहे. एलपीजी कंट्रोल ऑर्डर 2000 अंतर्गत अधिकाऱ्यांना विशेष अधिकार दिले आहे. या नियमांनुसार, केंद्र किंवा राज्य सरकारचे अधिकृत अधिकारी कुठल्याही वाहन, गोदाम किंवा ठिकाणी तपासणी करू शकते, तसंच पेट्रोलियम उत्पादन साठेबाजी केली किंवा अवैध वाहतूक आढळली तर  साठा जप्त केला जाईल.  साठवणूक आणि काळाबाजार रोखणे ही गरज आहे, जेणेकरून ग्राहकांना नियमित गॅस पुरवठा मिळत राहील.

advertisement

आतापर्यंत १ भारतीय नाविकाचा मृत्यू

4. खाडीमध्ये 23 हजार सीफेअरर्स काम करत आहेत.  स्ट्रेट ऑफ होर्मुजजवळ असलेल्या जहाजांवर आणि नाविकांवर सतत लक्ष ठेवले जात आहे.  पश्चिम भागात 24 जहाजं आहेत, ज्यावर एकूण 677 नाविक आहेत. पूर्व भागात 3 जहाजं आहेत, ज्यावर 76 नाविक आहेत. सरकारनुसार खाडी भागात एकूण सुमारे 23 हजार भारतीय नाविक काम करत आहेत. आतापर्यंत तीन भारतीय नाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर एक नाविक बेपत्ता आहे, असं पोर्ट आणि शिपिंग मंत्रालयाचे स्पेशल सेक्रेटरी राजेश कुमार सिन्हा यांनी सांगितलं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकराचा देशी जुगाड, गोडतेलावरची फ्यूल चूल, 7 रुपयांत एक तास चालणार!
सर्व पहा

5. पंतप्रधान मोदींनी इराणच्या राष्ट्रपतींशी चर्चा केली असून 170 भारतीयांना लवकरच सुखरुपपणे भारतात आणले जाणार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी इराणच्या राष्ट्रपतींशी चर्चा केली आणि त्या भागातील सुरक्षा परिस्थितीवर चर्चा केली. चर्चेदरम्यान पंतप्रधानांनी भारताची भूमिका स्पष्टपणे मांडली. याशिवाय भारत आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्येही द्विपक्षीय संबंध आणि ब्रिक्सशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली. गेल्या काही दिवसांत इराणमधून 170 भारतीय लँड बॉर्डर पार करून परत येत आहेत. इराणने विनंती केली आहे की, ब्रिक्सने या प्रकरणात सकारात्मक भूमिका घ्यावी. एमईएनुसार भारत सर्व ब्रिक्स देशांशी चर्चा करत आहे, जेणेकरून वेस्ट आशियातील मुद्द्यावर एकमत होऊ शकेल.  2026 मध्ये भारत ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवतो आहे.

मराठी बातम्या/देश/
LPG Crisis Update: भारतात गॅसची टंचाई का झाली? 5 महत्त्वाची कारणं समोर, सिलेंडर साठवणाऱ्यांना होणार जेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल