काय म्हणाले मुरलीधर मोहोळ?
AAIB चा हा प्राथमिक अहवाल आहे. याच्या आधारे आपण कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू शकत नाही. यापूर्वी असे अपघात झाले तर ब्लॅक बॅाक्स परदेशात पाठवावा लागायचा. आता आपणच वेगाने हे पूर्ण तपासू शकतो. एआयबी ही स्वतंत्र बॅाडी आहे. त्यात मंत्रालयातच काही हस्तक्षेप नसतो, असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.
advertisement
अत्यंत तोकडे संभाषण, पुढची तपासणी... - मुरलीधर मोहोळ
पायलटच्या संभाषणाच्या आधारे काही निष्कर्ष काढता येणार नाही. कारण दोन्ही पायलटमधील ते एक अत्यंत तोकडे संभाषण आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पुढची तपासणी आवश्यक आहे. त्या अहवालाची आपण वाट पहावी, त्यानंतर पुढील निष्कर्ष काढणं योग्य ठरेल, असंही मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.
तू इंजिन का बंद केलं?, पायलटमधील संभाषण
दरम्यान, AAIB च्या 15 पानांच्या अहवालानुसार, विमानाने 180 नॉट्सचा कमाल निर्देशित एअरस्पीड (IAS) गाठला. त्यानंतर लगेचच, इंजिन-1 आणि इंजिन-2 चे इंधन कट-ऑफ स्विच 'RUN' वरून 'CUTOFF' स्थितीत हलले, ज्यामुळे इंजिन बंद झाले, अशी माहिती समोर आली आहे. तर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये एका पायलट दुसऱ्याला 'तू इंजिन का बंद केले?' असे विचारताना ऐकू आलंय. त्यामुळे हा अपघात होता की घातपात? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.