संसदरत्न पुरस्कारकडे कानाडोळा
भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी संसदरत्न पुरस्कारकडे कानाडोळा केल्याचं पहायला मिळालं आहे. महाराष्ट्र सदनात पुरस्कार सोहळा होत असल्यामुळे निशिकांत दुबे यांनी पुरस्कार समारंभाला गैरहजर होते. मराठी हिंदी वादामध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर निशिकांत दुबे यांना संसद परिसरात महाराष्ट्राच्या तीन महिला खासदारांनी जवाब विचारला होता. त्यावेळी निशिकांत दुबे यांची कोंडी झाल्याचं पहायला मिळालं होतं. त्यानंतर संसदरत्न पुरस्कारासाठी निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र सदनात येणं टाळल्याचं पहायला मिळालं आहे.
advertisement
संसदेच मराठी खासदारांचा डंका
महाराष्ट्रातील खासदार स्मिता वाघ (भाजप), खासदार मेधा कुलकर्णी (भाजप), खासदार सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार गट), खासदार श्रीरंग बारणे (शिवसेना), खासदार नरेश म्हस्के (शिवसेना), खासदार अरविंद सावंत (शिवसेना- उबाठा) आणि खासदार वर्षा गायकवाड (काँग्रेस) या सात खासदारांचा संसदेत उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘संसदरत्न’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.
प्राइम फाउंडेशनच्या वतीनं लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना त्यांच्या उत्कृष्ट संसदीय कामगिरीसाठी दिल्या जाणाऱ्या संसदरत्न पुरस्कार सोहळा राजधानी दिल्ली इथं संसदीय कायदा मंत्री किरण रिजीजू यांच्या उपस्थितीत पार पडला. राज्यनिहाय विचार केला तर यावर्षी महाराष्ट्रातील 7 खासदारांना पुरस्कार मिळाले असून उत्तर प्रदेश, झारखंड आणि राजस्थानला प्रत्येकी 2 खासदारांना संसदरत्न पुरस्कार मिळाले आहेत. ओडिशा, तामिळनाडू, केरळ आणि आसाम राज्यातील प्रत्येकी एका खासदाराला संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे.
