मेहनाज खानला जेव्हा सोशल मीडियावरून कळलं की, संत प्रेमानंद महाराज गंभीर किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत. तेव्हा तिने कोणताही संकोच न करता आपली एक किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. मेहनाज म्हणाल्या, "संत प्रेमानंद महाराज हे केवळ एका विशिष्ट धर्माचे संत नाहीत, तर ते संपूर्ण समाजाला योग्य दिशा दाखवतात. त्यांचे जीवन आपल्यासाठी प्रेरणा आहे आणि मी त्यांचे जीवन वाचवण्यासाठी काहीही करू शकते."
advertisement
प्रार्थनेने सुरुवात केली
मेहनाजने तिच्या श्रद्धेने हे उदात्त कार्य सुरू केले. शुक्रवारची नमाज अदा केल्यानंतर तिने विशेष प्रार्थना केली आणि संत प्रेमानंद महाराजांना दीर्घायुष्य आणि ते लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना केली. तिने सांगितलं की, खरा धर्म तोच आहे जो मानवतेची सेवा करायला शिकवतो आणि कोणत्याही धर्माचा असो, देवाला प्रार्थना करता येते.
समाजासाठी संदेश
खरं तर, सध्या देशभरात धार्मिक तणाव आणि कट्टरतावाद शिगेला पोहोचला आहे. अनेक ठिकाणी धार्मिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा स्थितीत एका मुस्लीम मुलीने प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या घटनेकडं सामाजिक सौहार्दाचं उदाहरण म्हणून पाहिलं जातंय. मेहनाज खानच्या या निर्णयामुळे तिचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.