अनुराधाने देशातल्या अनेक राज्यांमधल्या लोकांना फसवल्याचं तपासात समोर आलं आहे. अनुराधाने ज्यांच्याशी लग्न केलं त्यांच्यासोबत पहिली रात्र घालवल्यानंतर ती रोख रक्कम, दागिने आणि मोबाईल अशा महागड्या वस्तू घेऊन पसार व्हायची. अनुराधाच्या अनेक पतींपैकी एक असलेल्या विष्णू गुप्ता याने तिच्याविरोधात तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी अनुराधाविरोधात गुन्हा दाखल केला, तेव्हा तिचे काळे कारनामे समोर आले.
advertisement
सुनिता आणि पप्पू मीना या दोन व्यक्तींनी आपल्याला लग्नासाठी मुलगी बघतो असं सांगितलं, त्यानंतर त्यांनी अनुराधासोबत माझं लग्न लावून दिलं, असं विष्णूने पोलिसांना सांगितलं. लग्नासाठी आपण 2 लाख रुपये दिले आणि लग्न सवाई माधोपूरमध्ये झालं, पण लग्नाच्या 7 दिवसांमध्येच अनुराधा रोख रक्कम, दागिने आणि मोबाईल घेऊन फरार झाली, असंही विष्णू म्हणाला. भोपाळच्या शिवनगरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली आहे.
टोळी शोधायची टार्गेट
या टोळीतील लोक सुरूवातीला लग्नासाठी मुलगी शोधणाऱ्या लोकांना शोधायचे आणि त्यांना अनुराधाचे फोटो दाखवायचे, त्यानंतर लग्नाच्या नावाखाली दोन ते पाच लाख रुपये गोळा केले जायचे. पैसे गोळा झाल्यावर वधू-वराचं लग्न लावलं जायचं. लग्न झाल्यानंतर काही दिवसांमध्येच अनुराधा पैसे, दागिने तसंच घरातल्या मौल्यवान वस्तू घेऊन पसार व्हायची, पण आता अनुराधाविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिने आणखी किती जणांची फसवणूक केली आहे, हे पोलीस तपासात समोर येणार आहे.