कधी घडली घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, या तिन्ही बहिणी अल्पवयीन आहेत. एकीच वय 12, दुसरीचं 14 आणि तिसरीचं 16 वर्ष होतं. या तिन्ही बहिणींचे एकमेकींवर खूप प्रेम होतं. त्यांचं जेवण, झोप आणि शाळा सगळं काही एकत्र असायचं. पण गेल्या दोन वर्षांपासून या तिघींनी शाळेत जाणं बंद केलं होतं आणि त्या पूर्णपणे मोबाईलमधील 'टास्क-आधारित' कोरियन गेममध्ये अडकल्या होत्या. बुधवारी पहाटे २ वाजता, जेव्हा घरचे गाढ झोपेत होते, तेव्हा या तिघींनी आपल्या खोलीचा दरवाजा आतून बंद केला आणि बाल्कनीत स्टूल लावून तिघींनी उडी घेत आपलं आयुष्य संपवलं.
advertisement
चिठ्ठीत काय लिहिलंय
घटनेनंतर पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे, या चिठ्ठीमध्ये मुलींनी एक मेसेज लिहून ठेवला आहे. या चिठ्ठीत लिहिलंय, "मम्मी, बाबा, आम्हाला माफ करा... आता तुम्हाला कळेल की तुम्ही जो गेम आम्हाला सोडायला सांगत होतात, तो आम्हाला किती प्रिय होता. - कोरियन लव्हर गेम." या शब्दांनी हे स्पष्ट केलं की, घरच्यांनी गेम खेळण्यापासून रोखलं होतं, पण त्याचं व्यसन इतकं टोकाचं होतं की त्यांनी आयुष्यापेक्षा गेमला जास्त महत्त्व दिलं.
वडिलांची दोन लग्न अन्...
या घटनेचा तपास करताना एक वेगळी कौटुंबिक पार्श्वभूमीही समोर आली. मुलींच्या वडिलांनी दोन लग्ने केली होती आणि त्या दोन्ही सख्ख्या बहिणी होत्या. पहिल्या पत्नीपासून दोन मुलं आणि दुसऱ्या पत्नीपासून तीन मुलं असा हा मोठा संसार एकाच छताखाली राहत होता. आत्महत्या केलेल्या तीन मुलींपैकी दोन धाकट्या पत्नीच्या, तर एक थोरल्या पत्नीची मुलगी होती. पण घरात कधीही भेदभाव नव्हता, या तिघीही सख्ख्या बहिणींप्रमाणेच वागायच्या आणि अखेर मृत्यूच्या दारातही त्या एकत्रच गेल्या.
घटनेनंतर परिसरात खळबळ
या घटनेनंतर भारत सिटी सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण आहे. कोविड़ काळात मुलांना अभ्यासासाठी मिळालेला मोबाईल त्यांच्या जीवावर उठेल, अशी कल्पनाही कोणाही केली नव्हती. "मुलांना मोबाईल द्यावा की नाही?" ही चर्चा आता प्रत्येक घरात सुरू झाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, तो 'कोरियन लव्ह गेम' नेमका कोणता होता आणि त्यात असे कोणते टास्क दिले जात होते, याचा शोध घेतला जात आहे.
