बॉस्केटबॉल खेळताना माहिती मिळाली, जालन्याची लेक थेट जर्मनीला निघाली, खास गेमसाठी निवड
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आईसस्टॉक स्पर्धेसाठी जालन्यातील भाकरवाडीच्या श्रुती मिसाळची निवड झाली आहे.
जालना : आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आईसस्टॉक स्पर्धेसाठी जालन्यातील भाकरवाडीच्या श्रुती मिसाळची निवड झाली आहे. सुरुवातीपासूनच श्रुतीला खेळांची आवड आहे. जम्मू काश्मीरमधील गुलमर्ग येथे झालेल्या राष्ट्रीय निवड स्पर्धेत ती आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरली. येत्या 3 ते 6 मार्च दरम्यान जर्मनीतील इन्झेल या शहरात स्पर्धा होणार आहेत. तिच्या या कामगिरीमुळे तिच्या आणि तिच्या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पाहुयात श्रुती मिसाळच्या प्रवासाविषयी…
श्रुतीचे माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथे झाले. सध्या ती शहरातील एका महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत आहे. शिकत असतानाच ती बास्केटबॉल देखील खेळायची. बास्केटबॉलचा सराव करत असतानाच तिला आईसस्टॉक खेळणारे काही तरुण आढळले. या खेळाविषयी कुतूहल निर्माण झाल्याने तिने याबद्दल प्रशिक्षकांना विचारले. इथूनच ती या खेळाकडे वळली.
advertisement
सुरुवातीला पुण्यातील हडपसर इथे राज्यस्तरीय स्पर्धा झाली. इथे मला गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉन्झ मेडल तीन वेगवेगळ्या प्रकारात मिळाले. यानंतर गुलमर्ग इथे 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय स्पर्धा झाली. या स्पर्धेत माझी जर्मनीतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक पटकावण्याची इच्छा असल्याचे श्रुती हिने सांगितले. तर श्रुतीने मिळवलेल्या यशाचा बाप म्हणून आपणांस अभिमान वाटतो, असं तिचे वडील विश्वास मिसाळ म्हणाले.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Feb 04, 2026 3:37 PM IST
मराठी बातम्या/जालना/
बॉस्केटबॉल खेळताना माहिती मिळाली, जालन्याची लेक थेट जर्मनीला निघाली, खास गेमसाठी निवड








