20000 कोटी रुपयांचा फटका
या विधेयकानुसार, रिअल-मनी गेमिंगला आता सार्वजनिक आरोग्य आणि समाजासाठी धोका मानले गेले आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, पैशांच्या गेमिंगमुळे तरुणांमध्ये व्यसनासारखी सवय लागते आणि कुटुंबाची बचत संपुष्टात येते. या धोक्याला गांभीर्याने घेऊन सरकारने नियम लागू केले, ज्यामुळे कंपन्यांना आपले गेम्स बंद करणं भाग पडलं. या निर्णयामुळे देशातील सुमारे ४५ कोटी युजर्स प्रभावित झाले असून, जवळपास २०,००० कोटी रुपयांचा फटका बसल्याचा अंदाज आहे.
advertisement
गेम्स बंद करण्याची घोषणा
एमपीएल (Mobile Premier League) ने सर्वात आधी भारतात सर्व पैशांचे गेम्स बंद करण्याची घोषणा केली. त्यानंतर ड्रीम स्पोर्ट्स (ड्रीम११ ची मूळ कंपनी) ने २० ऑगस्ट रोजी आपल्या कर्मचाऱ्यांना सर्व कॅश गेम्स बंद करण्याची माहिती दिली. झुपीनेही पेड गेम्स बंद केले असले, तरी त्यांचे लूडो सुप्रीम, लूडो टर्बो आणि स्नेक्स अँड लॅडर्स हे मोफत गेम्स सुरू राहतील असे स्पष्ट केले आहे.
ड्रीम ११ मधून पैसे कसे काढून घेयचे?
या कंपन्यांनी गेम्स बंद केल्यामुळे युजर्सना त्यांच्या खात्यातील पैसे काढण्याची चिंता आहे. ड्रीम ११ आणि एमपीएलने पैसे काढण्यासाठी सोपी प्रक्रिया दिली आहे. तुमच्या ड्रीम ११ अकाउंटमध्ये लॉग इन करा. त्यानंतर ‘माय बॅलन्स’ सेक्शनमध्ये जाऊन ‘विनिंग्स’वर क्लिक करा. ‘विथड्रॉ’ (पैसे काढा) बटण दाबून रक्कम भरा. तुमचे अकाउंट केवायसी (KYC) सत्यापित असेल तर पैसे बँक अकाउंटमध्ये त्वरित जमा होतील. किमान ₹२०० आणि कमाल ₹२,००,००० पर्यंत काढता येतात.
एमपीएल (MPL) मधून पैसे कसे काढावे?
केवायसी पूर्ण करा आणि बँक अकाउंट लिंक करा. ‘वॉलेट’ पेजमधून ‘विथड्रॉ’ पर्याय निवडा. बँक अकाउंट आणि रक्कम निवडून ‘कन्फर्म’ करा. जर पैसे अडकले तर ‘ट्रान्झॅक्शन हिस्ट्री’ तपासा किंवा ‘कस्टमर सपोर्ट’शी संपर्क साधा. अनेकदा सर्वर रीस्टार्ट झाल्यावर पैसे आपोआप जमा होतात.
गेमिंग डिसऑर्डर
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील या गेमिंगला ‘गेमिंग डिसऑर्डर’ म्हणून जाहीर केले आहे, त्यामुळेच केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता अनेक कंपन्यांना नवा स्पॉन्सर शोधावा लागणार आहे.