TRENDING:

जंगलात शिजत होता कट, 48 तासात सगळं संपलं, ऑपरेशन महादेवची Inside Story

Last Updated:

पहलगाम हल्ल्यानंतर जंगलात कट शिजत होता. गुप्तचर यंत्रणेला माहिती मिळताच जवानांनी कारवाई करुन तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ऑपरेशन महादेवमध्ये लष्कर ए तोएबाचा कमांडर मुसा ठार झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पहलगाम हल्ल्यानंतर पुन्हा एकदा मोठं काहीतरी घडवण्याचा कट जंगलात शिजत होता. घनदाट जंगलात नियोजन सुरू असतानाच त्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली. गुप्तचर यंत्रणेला ही माहिती मिळताच तातडीनं जवानांना ही माहिती देण्यात आली. स्थानिक पोलीस आणि जवानांनी त्यानंतर मोठी कारवाई करुन तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.
News18
News18
advertisement

संरक्षण सूत्रांनुसार, आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास लष्कराच्या एरिया डोमिनेशन पार्टीला काही संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यानंतर तात्काळ ही मोहीम सुरू करण्यात आली. जवरवान रिज आणि महादेव रिज यांच्या मधल्या परिसरात ही चकमक झाली.

सुरुवातीला तीनही दहशतवादी मारले गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, जी नंतर खरी ठरली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दहशतवाद्यांच्या हालचालीची माहिती मिळाली होती, ज्यात दोन मारले गेले आणि एक जखमी झाला होता. सुरक्षा पथके आता घटनास्थळी दाखल झाली असून, लवकरच परिस्थिती स्पष्ट होईल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांच्या मृतदेहांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

advertisement

दहशतवाद्यांची ओळख पटवण्यासाठी ड्रोन फोटोग्राफीचा वापर केला जात आहे. या कारवाईमागे दोन दिवसांपूर्वी दाचीगाम जंगलात झालेल्या एका संशयास्पद संवादाची मुख्य भूमिका होती. या संवादानंतर जवानांना अलर्ट जारी करण्यात आला होता. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली आणि ती यशस्वीरित्या पार पडली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑपरेशन महादेवमध्ये लष्कर ए तोएबाचा कमांडर मुसा ठार झाला आहे.

advertisement

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शब्दांचा जादुगार! मराठी कविता 32 भाषांत अन् गुजराती अभ्यासक्रमात, कवी कोण?
सर्व पहा

या तिन्ही दहशतवाद्यांचा ऑपरेशन पहलगामशी थेट संबंध आहे की नाही याचा शोध घेतला जात आहे. यासोबत जवानांनी घटनास्थळावरुन स्फोटकं देखील जप्त केली आहेत. टीआरएफचे हे तिन्ही दहशतवादी होते अशी माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलीस आणि जवानांकडून आणखी कोणती माहिती समोर येते ते पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/देश/
जंगलात शिजत होता कट, 48 तासात सगळं संपलं, ऑपरेशन महादेवची Inside Story
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल