नेटवर्क18 ग्रुपचे मुख्य संपादक राहुल जोशी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूर ते सध्या घडत असलेल्या घडामोडींवर परखड भाष्य केलं.
"बांगलादेशने भारताशी असलेल्या संबंधांवर परिणाम करू शकणारी कोणतीही कृती टाळावी', असा सल्ला सिंह यांनी दिला. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी केलेल्या चिथावणीखोर विधानांबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, 'युनूसने अलीकडेच एका पाकिस्तानी जनरलला बांगलादेशचा नकाशा दिला, ज्यामध्ये भारताच्या ईशान्येकडील काही भाग बांगलादेशचा भाग असल्याचं दाखवण्यात आलं आहे. राजनाथ सिंह यांनी हे अत्यंत दुर्दैवी म्हटलं आणि असे घडू नयं, असं म्हटलंय.
advertisement
चीनसोबतच्या तणावाबद्दल प्रश्न विचारला असता सिंह म्हणाले की, 'चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या अलिकडच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सुधारणा दिसून येतंय. 'चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रपती शी जिनपिंग यांना संदेश पाठवला आहे की भारत दोन्ही देशांमधील वाद सोडवण्यासाठी सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. तसंच, संरक्षण मंत्र्यांनी पाकिस्तानसोबतच्या वादाबद्दलही बोलले आणि सांगितलं की, 'भारत सर्व शेजारी देशांसोबत वाद सोडवण्यास तयार आहे.'
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'न्यूज 18'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अणुचाचणी आणि ऑपरेशन सिंदूर या दोन महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. अणुचाचणीच्या भविष्याबद्दल बोलताना त्यांनी थेट उत्तर न देता, "हे तर भविष्यच सांगेल," असं म्हटलंय. मात्र, त्याच वेळी त्यांनी ठामपणे सांगितलं की, "जे काही करणे आवश्यक आहे, ते भारत नक्कीच करेल आणि या संदर्भात आम्हाला काहीही म्हणायचे नाही, मग ती चाचणी पाकिस्तान करत असो, अमेरिका करत असो किंवा इतर कोणीही. भारत कोणत्याही प्रकारच्या भीतीपोटी किंवा बाह्य दबावाखाली येऊन कोणताही निर्णय घेणार नाही' असंही सिंह यांनी सांगितलं.
'ऑपरेशन सिंदूर'अजून संपलं नाही...
'भारताची युद्ध करण्याची इच्छा नव्हती आणि पाकिस्तानने केलेल्या विनंतीमुळेच हे ऑपरेशन थांबवण्यात आलं. याव्यतिरिक्त, त्यांनी जोर देऊन सांगितलं की, ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे संपलेलं नाही, तर ते केवळ सध्याच्या परिस्थितीत स्थगित करण्यात आले आहे. भारताने आपल्या कारवाईत केवळ दहशतवाद्यांनाच लक्ष्य केले, सामान्य नागरिकांना कोणतीही हानी पोहोचवली नाही' असंही ते म्हणाले.
