'ऑपरेशन सिंदूर'बाबत माहिती देताना एअर मार्शल भारती म्हणाले, आमचे काम अचूकतेने दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य करणे होते. किती मृत्यू झाले, किती जखमी झाले हे मोजणे आमचे उद्दिष्ट नव्हते. आमचा हेतू दहशतवाद्यांना धक्का देणे हा होता. त्यामुळे ज्या पद्धतीने आणि साधनांनी आपण कारवाई केली. त्याचा अपेक्षित परिणाम झाला आहे. मृतदेह मोजणं आमचं काम नाही, हे त्यांनीच (पाकिस्तानने) मोजायचं आहे.
advertisement
आज रात्री पाहू, पण प्रत्युत्तर जबरदस्त असेल'-भारतीय लष्कराचा इशारा
भारतीय लष्कराच्या या स्पष्ट भूमिकेमुळे पाकिस्तानकडून चालवली जाणारी दिशाभूल आणि खोट्या बातम्यांना चपराक बसली आहे.
भारताने फक्त एक गोष्ट करावी, आम्ही पाकिस्तानला नष्ट करू; BLAचे पत्र
पाकिस्तानकडून फैलावल्या जाणाऱ्या अफवांना फाटा देत, भारतीय लष्कराने रविवारी स्पष्टपणे सांगितले की सर्व भारतीय हवाई दलाचे पायलट सुखरूप घरी परतले आहेत. पाकिस्तानकडून राफेल लढाऊ विमानांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, त्याला भारतीय लष्कराने ठाम प्रत्युत्तर दिले आहे.
लष्करी संचालन महासंचालक (DGMO) आणि एअर मार्शल ए. के. भारती यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, पाकिस्तानकडून भारताच्या लष्करी तळांवर हल्ला करण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हे सर्व प्रयत्न हाणून पाडले. आम्ही काही पाकिस्तानी विमाने पाडली आहेत, असे भारती यांनी सांगितले.