भारताने फक्त एक गोष्ट करावी, आम्ही पाकिस्तानला नष्ट करू; बलूच लिबरेशन आर्मी पत्रकाने खळबळ
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
बलुच लिबरेशन आर्मीने भारताकडे थेट मदतीची मागणी करत पाकिस्तानवर हल्ला करण्याचं आवाहन केलं आहे. पश्चिम सीमेवरून आम्ही पाकिस्तानचा सामना करू. तुम्ही फक्त हल्ला करा, असा संदेश BLA ने दिला आहे.
इस्लामाबाद: पाकिस्तानच्या सैन्याविरुद्ध लढत असलेल्या बलूच लिबरेशन आर्मी (BLA) ने भारताकडे मदत मागितली आहे. बीएलएने एक पत्र जारी करून म्हटले आहे की भारताने पाकिस्तानवर हल्ला करावा. आम्ही पश्चिमेकडून त्याला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी तयार आहोत. बलूच लिबरेशन आर्मीने स्पष्ट केले आहे की ते कोणत्याही देशाचे बाहुले नाहीत. तर प्रादेशिक लष्करी आणि राजकीय समीकरणात एक निर्णायक शक्ती आहेत.
बीएलएने पाकिस्तानच्या शांतता आणि युद्धविरामच्या वक्तव्यांना खोटा प्रचार आणि धोका असल्याचे म्हटले आहे. हा केवळ पाकिस्तानचा एक डाव आहे. आम्ही भारत आणि प्रादेशिक शक्तींना आवाहन करतो की पाकिस्तानच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका आणि निर्णायक पाऊल उचला. पाकिस्तानला 'दहशतवादाची फॅक्टरी' असे संबोधून बीएलएने म्हटले आहे की पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय जागतिक दहशतवादाचे केंद्र आहे.
advertisement
अनेक मोर्चेंवर पाक सैन्याला हरवले
बलूच लिबरेशन आर्मीने सांगितले की, कोणत्याही बाह्य समर्थनाशिवाय आम्ही पाकिस्तानसारख्या अणुबॉम्बधारी देशाला बलुचिस्तानच्या भूमीवर अनेक मोर्चेंवर पराभूत केले आहे. भारताने आम्हाला राजकीय, राजनैतिक आणि लष्करी सहकार्य करावे जेणेकरून पाकिस्तानला मुळापासून उखडून टाकता येईल. जोपर्यंत पाकिस्तान अस्तित्वात आहे. तोपर्यंत या प्रदेशात दहशतवाद आणि अस्थिरता कायम राहील, असा इशारा बीएलएने दिला आहे.
advertisement
पश्चिमी आघाडीवरून घेरण्याची तयारी
बलूच लिबरेशन आर्मीने म्हटले आहे की जर भारताने पाकिस्तानला संपवण्याचा निर्णय घेतला तर बीएलए पश्चिमी आघाडीवरून लष्करी सहकार्य देण्यासाठी तयार आहे. आम्ही त्याला पूर्णपणे नष्ट करू. जर जगाने या संधीला ओळखले नाही तर बलोच जनता आपल्या बळावर हा संघर्ष सुरू ठेवेल, असेही बीएलएने म्हटले आहे. स्वतंत्र बलुचिस्तानच या प्रदेशात कायमस्वरूपी शांतता, संतुलन आणि दहशतवादाचा शेवट सुनिश्चित करू शकते, असा दावा बीएलएने केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 11, 2025 7:24 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
भारताने फक्त एक गोष्ट करावी, आम्ही पाकिस्तानला नष्ट करू; बलूच लिबरेशन आर्मी पत्रकाने खळबळ