JF-17 लढाऊ विमानांनी LS-6 श्रेणीतील बॉम्ब वापरून केले. हे बॉम्ब अत्यंत विनाशकारी मानले जातात. हल्ला झाला तेव्हा गावातील लोक झोपलेले होते. जोरदार स्फोटांच्या आवाजाने त्यांची झोप उडाली आणि पाहता पाहता गावाचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात 30 नागरिकांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
advertisement
खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान हे दोन पाकिस्तानी प्रांत आहेत ज्यांनी देशाच्या सरकार आणि लष्कराविरुद्ध दीर्घकाळापासून संताप व्यक्त केला जातोय. या प्रांतांमधील अनेक सशस्त्र गटांविरुद्ध पाकिस्तानने स्वत:च्याच देशात एअर स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
दरम्यान, या घटनेवर अजूनही पाकिस्तान सरकारने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. हवाई दलाने हा हल्ला कोणत्या कारणाने केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, या हल्ल्यामध्ये ठार झालेले आणि जखमी झालेले सर्वजण सामान्य नागरिक आहेत. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे.