या भीषण अपघातानंतर बराच वेळा वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यावर मृतदेह आणि रक्ताचा सडा पडला होता. या दुर्घटनेची स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. चार जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना बिहारची राजधानी पटना इथे घडली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार फतुहा इथून हे गंगा स्नान करुन परत येत असताना हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. टँकरचे ब्रेक फेल झाले होते का? हा अपघात कसा झाला याचे कारण अद्याप समोर आलं नाही. मृतांमध्ये 7 महिला आणि एक पुरुष समावेश आहे. कुटुंबियांनी या दुर्घटनेनंतर टाहो फोडला. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. अपघातानंतर टँकर ड्रायव्हर फरार झाला आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 23, 2025 11:25 AM IST
मराठी बातम्या/देश/
गंगेत स्नान करुन घरी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, टँकर टेम्पोची धडक, 8 जणांचा मृत्यू