मोदी आणि पुतिन यांचा एकत्र प्रवास
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन चीनमधील तियानजिन येथे त्यांच्या द्विपक्षीय बैठकीच्या ठिकाणी एकाच कारमधून प्रवास करताना दिसले. SCO शिखर परिषदेच्या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमानंतर मोदी आणि पुतिन यांनी एकत्र प्रवास केल्यानंतर आता अमेरिकेचा थैयथयाट सुरू झाला आहे. मोदी आणि पुतिन यांच्या भेटीमुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांना घाम फुटल्याचं पहायला मिळतंय.
advertisement
नरेंद्र मोदींनी ट्विट करत काय म्हटलंय?
SCO शिखर परिषदेच्या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमानंतर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि मी आमच्या द्विपक्षीय बैठकीच्या ठिकाणी एकत्र गेलो. त्यांच्याशी झालेल्या संभाषण नेहमीच अर्थपूर्ण असतात, अशी पोस्ट नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर केली आहे.
SCO समिटमध्ये काय घडलं?
दरम्यान, SCO मध्ये भारत, चीन, रशिया, पाकिस्तान, इराण, बेलारूस, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांसारख्या 10 पूर्ण-सदस्य राष्ट्रांचा समावेश आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादावर कठोर भूमिका घेतली. त्यांनी विशेषतः जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करत, दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी दुहेरी मापदंड ठेवू नयेत, असं आवाहन केलं आहे. या संमेलनादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. या चर्चेत दोन्ही देशांनी दहशतवादविरोधी सहकार्य आणि व्यापार तूट कमी करण्यावर भर दिला.