पंतप्रधान मोदींनी ट्विट केले, आज सकाळी मी एएफएस आदमपूरला गेलो आणि आमच्या शूर हवाई योद्धे आणि सैनिकांना भेटलो. धैर्य, दृढनिश्चय आणि निर्भयतेचे प्रतीक असलेल्या लोकांसोबत असणे हा एक अतिशय खास अनुभव होता. आमचे सशस्त्र दल आमच्या देशासाठी जे काही करतात त्यासाठी भारत त्यांचा ऋणी राहील. यानंतर पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेसवरून पाकिस्तानला कडक इशारा दिला.
advertisement
जे दहशतवादी पाकिस्तान लष्कराच्या पाठिंब्यावर हल्ला करतात भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या त्याच लष्कराला घरात घुसून धडा शिकवल्याचे मोदींनी सांगितले.
कठीण काळात मदत केली आता विश्वासघात केला, भारताला नडणाऱ्यांना मोदी सोडणार नाहीत
पंतप्रधान मोदी आदमपूरमध्ये काय बोलले
युद्धविराम नाही, तात्पुरती स्थगिती: पंतप्रधान मोदी म्हणाले, पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारताने केवळ लष्करी कारवाई स्थगित केली आहे. जर पाकिस्तानने पुन्हा दहशतवादी कारवाया किंवा लष्करी साहस दाखवले, तर त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. हे उत्तर आमच्या अटींवर आणि आमच्या वेळेनुसार असेल.
शांती हवी, पण आक्रमण झाल्यास चोख उत्तर: भारत शांतता इच्छितो, पण जर हल्ला झाला. तर शत्रूला धुळीस मिळवण्याची क्षमताही भारताकडे आहे, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले.
आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर: गेल्या दशकात आमच्याकडे जगातील सर्वात आधुनिक तंत्रज्ञान आले आहे. जटिल प्रणाली कार्यक्षमतेने चालवणे हे मोठे कौशल्य आहे. तुम्ही तंत्रज्ञानाला युक्तीशी जोडून दाखवले आहे. या खेळात तुम्ही जगातील सर्वोत्तम आहात हे सिद्ध केले आहे. भारताचे सैन्य केवळ शस्त्रांनीच नाही, तर डेटा आणि ड्रोननेही शत्रूला चकवण्यात माहिर आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याने आणि वक्तव्याने पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आहे की, भारत कोणत्याही परिस्थितीत आपल्या सुरक्षेशी तडजोड करणार नाही आणि कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज आहे.