कठीण काळात मदत केली आता विश्वासघात केला, भारताला नडणाऱ्यांना मोदी सोडणार नाहीत
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
भारत-पाकिस्तान तणाव अमेरिकेच्या मध्यस्थीने मिटला. तुर्की आणि अझरबैजानने पाकिस्तानला मदत केल्याने भारताकडून आता कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात. दरम्यान ट्रॅव्हल एजंट्सनी तुर्की-अझरबैजानच्या बुकिंगवर बंदी घातली.
नवी दिल्ली: गेल्या १८ दिवसांपासून सुरू असलेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अखेर अमेरिकेच्या मध्यस्थीने मिटला आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान लष्कराने कुरापती सुरू केल्या. यावर भारताने पाकिस्तानला धडा शिकवला. दोन्ही देशातील या संघर्षामध्ये जगातील काही देश भारताच्या बाजूने काही पाकिस्तान तर काहींनी तटस्थ भूमिका घेतली होती. पाकिस्तानची बाजू घेणाऱ्यां देशांमध्ये आघाडीवर होता चीन त्यासोबत तुर्की,अझरबैजान आणि कतार यांचा देखील समावेश होता. पाकविरुद्धच्या संघर्षात भारताने त्यांना योग्य धडा शिकवला आहे. यात चीनकडून देण्यात आलेल्या लष्करी मदतीची पोलखोल झाली. आता भारताच्या लिस्टवर पाकिस्तानला मदत करणाऱ्या देशांचा समावेश आहे.
विश्वासघात
पाकिस्तानविरुद्धच्या लढाईत ज्यांनी त्यांची मदत केली यात तुर्की आणि अझरबैजान यांचा समावेश होता. पहलगाम सारखा हल्ला झाल्यानंतर देखील पाकिस्तानची बाजू घेणाऱ्या या दोन देशांनी हा विचार नाही जेव्हा त्यांना गरज होती तेव्हा भारताने मदत पाठवली होती. मग ती करोनाच्या काळात असो की इतर वेळी. तुर्कीने तर पाकिस्तानला ड्रोन देकील पाठवले होते.
advertisement
तुर्कीच्या अर्थव्यवस्थेची अवस्था संपूर्ण जगाला माहिती आहे. पर्यटनावर त्यांची अर्थव्यवस्था अवलंबून असताना दरवर्षी ३ लाखांहून अधिक भारतीय पर्यटक त्यांच्या पर्यटन अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावतात. अझरबैजानची अवस्था यापेक्षा वेगळी नाही.आता या दोन देशांविरुद्ध मोदी सरकार कठोर कारवाई करणार असल्याचे संकेत मिळत आहे. या देशांकडे जाणारी विमान उड्डाणे थांबवणे, पर्यटन कंपन्यांवर दबाव आणणे यासारख्या उपायांचा विचार केला जाऊ शकतो का? असे सूत्रांकडून कळते.
advertisement
दरम्यान भारत सरकारने यावर काही बोलण्याआधी देशातील प्रमुख ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ इंडिया (TAAI) ने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशभरातील ३,५०० हून अधिक ट्रॅव्हल एजंट्सच्या या संघटनेने तुर्की (टर्की) आणि अझरबैजानच्या सर्व प्रकारच्या यात्रा बुकिंग आणि त्यांच्या प्रचारावर त्वरित बंदी घातली आहे. यासोबतच, संघटनेने भारत सरकारला या दोन्ही देशांविरुद्ध कठोर प्रवास मार्गदर्शक सूचना (ट्रॅव्हल अॅडव्हायजरी) जारी करण्याची विनंती केली आहे.
advertisement
टीएएआयच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड युनिटचे अध्यक्ष हमेंद्र सिंह जादौन यांनी सांगितले की, तुर्की आणि अझरबैजानने सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीत पाकिस्तानला पाठिंबा दर्शविला आहे. जो भारताच्या हिताच्या विरोधात आहे. याच कारणामुळे या दोन्ही देशांच्या यात्रांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. ट्रॅव्हल एजंट्स आता केवळ नवीन बुकिंग टाळत नाहीत. तर ज्या पर्यटकांनी यापूर्वी बुकिंग केली आहे. त्यांनाही त्यांची यात्रा रद्द करण्याचा सल्ला देत आहेत.
advertisement
सामान्यतः हा काळ तुर्की आणि अझरबैजानच्या प्रवासासाठी अनुकूल मानला जातो. त्यामुळे अनेक पर्यटकांनी यापूर्वीच बुकिंग केली होती. मात्र या दोन्ही देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिल्याच्या बातम्या समोर येताच बहुतेक प्रवाशांनी त्यांची बुकिंग रद्द करून इतर पर्यायांचा शोध घेणे सुरू केले आहे.
२०२४ मध्ये भारताकडून मोठा पर्यटन व्यवसाय
वर्ष २०२४ मध्ये भारतामधून सुमारे २.७५ लाख पर्यटक तुर्कीला आणि २.५ लाखांहून अधिक लोक अझरबैजानला भेट देण्यासाठी गेले होते. अंदाजानुसार या यात्रांमुळे तुर्कीला सुमारे २,७५० कोटी रुपये आणि अझरबैजानला सुमारे २,००० कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. प्रति व्यक्ती खर्चाबद्दल बोलायचे झाल्यास तुर्कीच्या टूर पॅकेजची सरासरी किंमत १ लाख ते १.५ लाख रुपये होती. तर अझरबैजानमधील बाकूसाठी हा खर्च ८० हजार ते १.२५ लाख रुपये होता.
advertisement
आता जॉर्जिया पर्यटकांची नवीन आवड
जेव्हापासून तुर्की आणि अझरबैजानसाठी बुकिंग बंद झाली आहे. तेव्हापासून पर्यटक आता जॉर्जियासारख्या पर्यायांकडे वळत आहेत. ट्रॅव्हल एजंट्सच्या म्हणण्यानुसार जॉर्जिया भारतीय पर्यटकांसाठी नवीन पहिले प्राधान्य बनले आहे. याव्यतिरिक्त थायलंड, युरोप आणि व्हिएतनाम यांसारख्या गंतव्यस्थानांची मागणीही वेगाने वाढली आहे. जॉर्जियामधील अटलांटा हिस्ट्री सेंटर, फॉक्स थिएटर, एक्वेरिअम आणि लुलवॉटर पार्क यांसारखी आकर्षणे पर्यटकांना आकर्षित करत आहेत.
advertisement
दरम्यान इंदूरमधील ट्रॅव्हल कंपनी ट्रॅव्होमिंटनेही तुर्की आणि अझरबैजानसाठी सर्व पॅकेज बुकिंग त्वरित निलंबित केली आहे. कंपनीचे सीईओ आलोक सिंह यांच्या मते, प्रवाशांना त्यांची सध्याची बुकिंग कोणत्याही रद्द शुल्कशिवाय रद्द करण्याची सुविधा देण्यात आली आहे. अत्यावश्यक गरजांसाठी विमान बुकिंग मात्र उपलब्ध राहील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 11, 2025 6:04 PM IST