पूर्वीच्याकाळी दोन नावं का ठेवली जायची, राशी नाव गुप्त ठेवण्यामागचं 'हे' सिक्रेट तुम्हाला माहिती आहे का?

Last Updated:

हिंदू संस्कृतीमध्ये मुलाचे बारसे करताना दोन नावे ठेवण्याची परंपरा जुनी आहे. एक म्हणजे 'राशी नाव' जे जन्म कुंडलीनुसार असते आणि दुसरे म्हणजे 'व्यावहारिक नाव'.

News18
News18
Rashi Naav Secret : हिंदू संस्कृतीमध्ये मुलाचे बारसे करताना दोन नावे ठेवण्याची परंपरा जुनी आहे. एक म्हणजे 'राशी नाव' जे जन्म कुंडलीनुसार असते आणि दुसरे म्हणजे 'व्यावहारिक नाव'. अनेकदा पालकांना प्रश्न पडतो की, जर राशीनुसार नाव काढले आहे, तर तेच नाव व्यवहारात का वापरू नये? किंवा दोन्ही नावे वेगळी का असावीत?
जन्म राशी आणि नक्षत्राचा आधार
बाळाचा जन्म ज्या वेळी होतो, त्या वेळी चंद्र ज्या राशीत आणि ज्या नक्षत्रात असतो, त्यावरून त्याची 'जन्म रास' ठरते. नक्षत्राच्या विशिष्ट चरणावरून एक अक्षर निघते, त्याला 'आरंभ अक्षर' म्हणतात. या अक्षरावरून ठेवलेले नाव म्हणजे राशी नाव. हे नाव बाळाच्या कुंडलीशी आणि नशिबाशी थेट जोडलेले असते.
नकारात्मक शक्तींपासून संरक्षण
प्राचीन काळी अशी श्रद्धा होती की, एखाद्या व्यक्तीचे राशी नाव जर सर्वांना माहित झाले, तर त्याचा वापर करून कोणीही त्या व्यक्तीवर करणी-बाधा किंवा काळी जादू करू शकतो. त्यामुळे राशी नाव 'गुप्त' ठेवण्याची पद्धत पडली आणि व्यवहारात वापरण्यासाठी दुसरे नाव ठेवले जाऊ लागले.
advertisement
ध्वनी लहरींचा प्रभाव
प्रत्येक नावाच्या उच्चारातून ठराविक ध्वनी लहरी निर्माण होतात. राशी नाव हे तुमच्या मूळ प्रकृतीला आणि ग्रहांना शांत करण्यासाठी असते. मात्र, व्यावहारिक नाव हे तुमच्या सामाजिक प्रतिमेसाठी असते. ज्योतिषशास्त्रानुसार, काही अक्षरे तुमच्या राशीला अनुकूल नसतात. जर व्यवहारात चुकीच्या अक्षराचे नाव वापरले गेले, तर प्रगतीत अडथळे येऊ शकतात.
नावाचा 'अवकहडा' तक्ता
ज्योतिषशास्त्रात 'अवकहडा' चक्राचा वापर करून नावाचे पहिले अक्षर निश्चित केले जाते. जर जन्म राशीनुसार नाव न ठेवता केवळ आवडीनुसार नाव ठेवले, तर त्या नावाचा आणि व्यक्तीच्या कुंडलीचा ताळमेळ बसत नाही. व्यावहारिक नाव हे सहसा टोपणनाव किंवा आई-वडिलांच्या आवडीनुसार असते, जे सामाजिक संवादासाठी सोपे ठरते.
advertisement
कुंडलीतील 'नाम रास' आणि 'जन्म रास'
ज्यांचे जन्म नाव माहित नसते, त्यांची रास त्यांच्या व्यावहारिक नावाच्या पहिल्या अक्षरावरून ठरवली जाते, त्याला 'नाम रास' म्हणतात. मात्र, विवाहाच्या वेळी किंवा मोठ्या धार्मिक विधींच्या वेळी नेहमी 'जन्म रास' महत्त्वाची मानली जाते.
व्यवहारातील सोय
अनेकदा राशीवरून येणारी अक्षरे ही नावांसाठी थोडी कठीण किंवा जुन्या पद्धतीची वाटू शकतात. आधुनिक काळात पालकांना आपल्या मुलांचे नाव युनिक आणि अर्थपूर्ण हवे असते. म्हणूनच राशीचे अक्षर निवडून केवळ कुंडलीसाठी ते नाव वापरले जाते आणि शाळेत किंवा कागदपत्रांवर वेगळे नाव लावले जाते.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
पूर्वीच्याकाळी दोन नावं का ठेवली जायची, राशी नाव गुप्त ठेवण्यामागचं 'हे' सिक्रेट तुम्हाला माहिती आहे का?
Next Article
advertisement
Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement