मुंबई-पुणे प्रवास आता सुसाट, 'खंडाळा घाट' टाळता येणार, प्रवासाचा वेळ वाचणार, गेमचेंजर प्लॅन काय?
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
आता मुंबईहून पुण्याकडे जाताना लागणारा खंडाळा घाट टाळता येणार आहे. महत्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
पुणे: मुंबई–पुणे एक्सप्रेस-वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत होता. तासन्तास वाहने एका ठिकाणी अडकून पडत होती, कित्येक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. यामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागत होता. मात्र, आता या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे. कारण एक्सप्रेस-वे मार्गे मुंबईहून पुण्याकडे जाताना खंडाळा घाट टाळता येणार आहे. महत्त्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. हा नवा मार्ग तयार झाल्यानंतर लोणावळा–खंडाळा घाटातून जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होणार आहे.
बोगद्यांचे 98 टक्के काम पूर्ण, लवकरच नवा मार्ग खुला
या प्रकल्पाअंतर्गत सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सुमारे 180 मीटर उंचीचा केबल-स्टेड पूल उभारण्यात येत आहे. डोंगराळ भागात सुरू असलेला प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात आव्हानात्मक मानला जातोय. या पुलासह बोगदे पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते पुणे हे अंतर सुमारे 6 किलोमीटरने कमी होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा किमान अर्धा तास वेळ वाचणार आहे.
advertisement
मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्यांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. खोपोली एक्झिट ते कुसगाव दरम्यान या मार्गावर दोन मोठे बोगदे आहेत. यातील एक बोगदा सुमारे 8.87 किलोमीटर लांबीचा असून दुसरा बोगदा सुमारे 1.67 किलोमीटर लांबीचा आहे. या दोन्ही बोगद्यांचे सुमारे 98 टक्के काम पूर्ण झाले असून सध्या शेवटची कामे सुरू आहेत. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर लोणावळ्यात जायचे असल्यासच जुन्या घाटमार्गाचा वापर करावा लागणार आहे. इतर सर्व प्रवासासाठी मुंबई–पुणे मार्गावर थेट आणि जलद प्रवास करता येणार आहे.
advertisement
काय आहेत प्रकल्पाची वैशिष्ट्ये?
view commentsमिसिंग लिंक प्रकल्पाची एकूण लांबी सुमारे 14 किलोमीटर आहे. या मार्गावर दोन मोठे बोगदे उभारण्यात आले आहेत, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक जलद होईल. या नव्या मार्गामुळे मुंबई–पुणे प्रवासाचा वेळ सुमारे 30 मिनिटांनी कमी होणार आहे. सध्या बोगद्यांचे अंदाजे 98 टक्के काम पूर्ण झाले असून फक्त अंतिम टप्प्यातील कामे शिल्लक आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 3:03 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
मुंबई-पुणे प्रवास आता सुसाट, 'खंडाळा घाट' टाळता येणार, प्रवासाचा वेळ वाचणार, गेमचेंजर प्लॅन काय?











