'धुरंधर 2'साठी धोक्याची घंटा! TOXIC चं धमाकेदार टीझर रिलीज, पहिल्या मिनिटालाच सुरू होतो इंटिमेट सीन, VIDEO

Last Updated:

Toxic Teaser Release: 'टॉक्सिक' चा टीझर रिलीज होताच त्याने जो धुमाकूळ घातला आहे, त्यानंतर आता 'धुरंधर २' च्या टीमच्या पोटात गोळा आला असणार, हे नक्की.

News18
News18
मुंबई: कधी काळी 'केजीएफ'मधून अख्ख्या भारताला वेड लावणाऱ्या साऊथ स्टार यश पुन्हा त्याचा जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. आज, ८ जानेवारी रोजी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत यशने त्याच्या बहुप्रतिक्षित 'टॉक्सिक' (Toxic) या चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज केलाय. या टीझरने फॅन्सना अक्षरशः वेड लावलंय. पण हा टीझर रिलीज होताच त्याने जो धुमाकूळ घातला आहे, त्यानंतर आता 'धुरंधर २' च्या टीमच्या पोटात गोळा आला असणार, हे नक्की.
गीतू मोहनदास यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'टॉक्सिक'चा टीझर रिलीज होऊन अवघे दोन तास झाले नाहीत, तोच त्याने ३० लाखांहून अधिक व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. टीझरची सुरुवात एका स्मशानभूमीच्या दृश्याने होते, जिथे माफिया टोळी कोणाच्या तरी मृत्यूचा शोक साजरी करत असते. अचानक तिथे एक आलिशान कार येते आणि वातावरण बदलतं.

Toxic च्या टीझरमध्ये काय आहे?

advertisement
टीझरच्या सुरूवातीलाच काही इंटिमेट सीन्स दाखवण्यात आले आहेत, ज्यामुळे या फिल्ममध्ये बोल्डनेसचा भरभरून वापर केला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर कारमधून बाहेर पडणारा तो रांगडा अवतार, लांब दाढी, हातात जळत असलेली सिगार, ओव्हरसाईज कोट आणि खांद्यावर मोठी बंदूक घेतलेला यश जेव्हा पडद्यावर येतो, तेव्हा एकच रोमांच उभा राहतो. यात त्याच्या पात्राचं नाव 'राया' असल्याचं समजतंय, जो माफिया वर्ल्डचा खरा मास्टरमाइंड आहे.
advertisement
टीझरच्या शेवटी यश जेव्हा अत्यंत शांत स्वरात "डॅडी इज होम" हा डायलॉग बोलतो, तेव्हा अक्षरशः अंगावर काटा येतो. हा केवळ संवाद नाही, तर यशने चित्रपटसृष्टीला दिलेला इशारा आहे की, बॉक्स ऑफिसचा खरा राजा परतला आहे. हा टीझर इतका प्रॉमिसिंग आहे की, त्याने एका झटक्यात 'धुरंधर २' सारख्या मोठ्या चित्रपटाला मोठा शॉक दिला आहे.
advertisement

19 मार्चला होणार जबरदस्त मूव्ही क्लॅश

येत्या १९ मार्च रोजी बॉक्स ऑफिसवर 'सुनामी' येणार आहे. कारण याच दिवशी यशचा 'टॉक्सिक' आणि रणवीर सिंहचा 'धुरंधर २' समोरासमोर उभे ठाकणार आहेत. 'टॉक्सिक' कन्नडसह हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम अशा ५ भाषांत रिलीज होणार. 'धुरंधर'च्या अफाट यशानंतर मेकर्सनी हा भागही पॅन-इंडिया ५ भाषांत रिलीज करण्याची घोषणा केली आहे. एकीकडे रॉकी भाईची जबरदस्त फॅन फॉलोईंग आणि दुसरीकडे 'धुरंधर'ची क्रेझ! या दोन दिग्गजांच्या लढाईत कोणता चित्रपट बाजी मारतो, हे पाहणं आता रंजक ठरेल.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'धुरंधर 2'साठी धोक्याची घंटा! TOXIC चं धमाकेदार टीझर रिलीज, पहिल्या मिनिटालाच सुरू होतो इंटिमेट सीन, VIDEO
Next Article
advertisement
Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement