काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
जगदीप धनखड यांना भारताचे उपराष्ट्रपती म्हणून विविध पदांवर आपल्या देशाची सेवा करण्याची अनेक संधी मिळाली आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा, असं नरेंद्र मोदी यांनी पोस्ट करत म्हटलं आहे.
उपराष्ट्रपतींचा राजीनामा का?
जगदीप धनखड यांनी 'आरोग्याच्या कारणास्तव' आणि 'वैद्यकीय सल्ल्यानुसार' उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला असल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला. त्यानंतर आता त्यांचा राजीनामा स्वीकार करण्यात आला आहे.
जगदीप धनखड यांचा कार्यकाळ
दरम्यान, जगदीप धनखड यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत होता, मात्र दोन वर्षांपूर्वीच त्यांनी हे पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या अचानक राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. धनखड यांनी 2022 मध्ये भारताचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. यापूर्वी त्यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही काम केलं आहे.
