झाशी, 12 ऑगस्ट : उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशात भूमाफिया आणि बेकायदेशीर अतिक्रमण करणार्यांविरुद्ध बाबाचे बुलडोझर हे सर्वात मोठे हत्यार बनले आहे. मात्र, यातच आता एक वेगळीच बातमी समोर आली आहे. झाशीमधून ही बातमी समोर आली आहे. जी घटना घडली ती पाहून सगळेच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
नेमकं काय घडलं -
advertisement
भूमाफियांना धडा शिकवण्यासाठी पोलीस अवैध अतिक्रमणांवर बुलडोझर चालवतात, असे अनेकदा दिसून येते. मात्र, अशात जर तुम्हाला कुणी असे म्हटले की, पोलिसांनी आपल्याच पोलीस ठाण्यात बुलडोझर मागवला, बुलडोझरची पुजा केली आणि तोच बुलडोझर जर त्या पोलीस ठाण्यावर चालवेन, तर कदाचित तुम्हाला विश्वास नाही बसणार. पण हो, हे खरंय. जो बुलडोझर पाहून भूमाफियांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत खळबळ उडते, तोच बुलडोझर पोलीस ठाण्यात बोलावला जातो, पूजा केल्यावर तो पोलीस ठाण्यावरच चढवला जातो, नेमका प्रकार काय आहे, हे जाणून घेऊयात.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना झाशीच्या बबिना पोलीस ठाण्याची आहे, असे सांगितले जात आहे. येथील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यात पोलीस ठाण्याच्या जागेचा खटला जिंकल्यानंतर पोलीस ठाण्याच्या अध्यक्षांनी आपल्या पोलीस ठाण्याची जमीन समतल करण्यासाठी बुलडोझर चालवून त्याची पूजन केली. तसेच बुलडोझरची पुजा केली. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या जमिनीला सपाट करणासाठी बुलडोझर वापरण्यात आला.
बबिना पोलीस ठाण्याच्या परिसराच्या आत खूप जमीन होती. मात्र, या जागेवर लोक रस्ता मागत होते. याप्रकरणी पोलीस विभागाने गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी खटला न्यायालयात चालला. आता बराच वेळ न्यायालयात प्रकरण चालल्यावर बबिना पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या बाजूने यामध्ये निकाल लागला. यापूर्वी बबिना पोलीस ठाण्याच्या पोलिसांचे अनेकदा रस्त्यांबाबत सर्वसामान्यांशी वाद झाले होते. पण न्यायालयाचा निकाल बबिना पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या बाजूने येताच पोलीस ठाण्याचे प्रमुख रणविजय सिंग यांनी पीएससी फोर्सच्या उपस्थितीत बुलडोझरचा आदेश दिला.
यानंतर आधी बुलडोझरची पूजा करण्यात आली. यानंतर भूमिपूजन करण्यात आले. तसेच ज्या रस्त्यावर सर्वसामान्यांचा हक्क सांगत होते, त्या रस्त्यावर बॅरेक बांधण्याचे काम पोलीस ठाण्याच्या आत सुरू झाले आहे. तर याप्रकरणी बबिना पोलिसांचे म्हणणे आहे की, बबिना पोलीस ठाण्याच्या आत ज्या रस्त्यासाठी सर्वसामान्य लोक मागणी करत होते, तो रस्ता वादाचा मुद्दा ठरत होता. मात्र, न्यायालयाचा निर्णय योग्य वेळी आला. हा निर्णय बबिना पोलीस ठाण्याच्या बाजूने आला आहे. अशा स्थितीत आता पोलीस ठाण्याविना पोलीस संपूर्ण जमिनीला अधिकृत करताना इथे सीमा भिंत बांधत आहेत.