TRENDING:

Rahul Gandhi : कोण आहे मिस्ट्री गर्ल, जिला राहुल गांधींनी शोधून काढलं, हरियाणात २२ वेळा केलं मतदान!

Last Updated:

Rahul Gandhi : हरियाणा विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाली असल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी आज पुरावेच सादर केले. ब्राझीलच्या मॉडेलने हरियाणामध्ये मतदान केले असल्याचा आरोप त्यांनी केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज आपल्या पत्रकार परिषदेत मतचोरीचा आरोप करत आरोपांचा मोठा बॉम्ब फोडला. हरियाणा विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाली असल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी आज पुरावेच सादर केले. ब्राझीलच्या मॉडेलने हरियाणामध्ये मतदान केले असल्याचा आरोप त्यांनी केला.
सीमा, विमला, सरस्वती...एकाच ब्राझिलीयन मॉडेलचे २२ वेळा मतदान, राहुल गांधींनी थेट पुरावाच दाखवला
सीमा, विमला, सरस्वती...एकाच ब्राझिलीयन मॉडेलचे २२ वेळा मतदान, राहुल गांधींनी थेट पुरावाच दाखवला
advertisement

राहुल गांधी यांनी म्हटले की, पूर्ण जबाबदारीने मी सत्य बोलतोय. हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात मतदान चोरीचा संशय होता. हरियाणाची आम्ही निवड केली आहे. निवडणुकीनंतर सर्व एग्झिट पोल्सनी काँग्रेसला क्लीन स्वीप दिलं होतं, पण पोस्टल आणि प्रत्यक्ष मतांमध्ये मोठा फरक होता. डेटाच्या आधारे आम्ही हरियाणामध्ये ही मतदान चोरी सिद्ध करू. जनतेसाठी हे अत्यंत महत्त्वाचं असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

advertisement

शंभर टक्के पुराव्यांसह मी या प्रकरणाशी संबंधित तथ्यं सादर करणार असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला. पत्रकार परिषदेत राहुल गांधी भाजप नेत्याचा व्हिडीओ दाखवला. हरियाणा निवडणुकीनंतर दोन दिवसांनी मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांची बाईट दाखवण्यात आली. यामध्ये त्यांनी आम्ही एकतर्फी विजयाचा दावा केला होता. आम्ही सगळी व्यवस्था केली असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. राहुल यांनी या वक्तव्यावर सैनी यांच्या स्मितहास्याकडे लक्ष वेधले.

advertisement

ब्राझीलची मॉडेल हरियाणात मतदार...

राहुल गांधींकडून एका महिलेचा फोटो दाखवण्यात आला. हरियाणामध्ये या महिलेने २२ वेळा मतदान केल्याचा आरोप केला.  सरस्वती, लक्ष्मी, अशी वेगवेगळी नावे असून वेगवेगळ्या बुथवर नावे मतदान असल्याचे राहुल गांधींचा दावा त्यांनी केला. हरियाणा निवडणुकीदरम्यान ही महिला २२ वेळा मतदान केल्याचं आम्हाला आढळलं आहे. हे मतदान तेही बनावट ओळखपत्रांच्या माध्यमातून करण्यात आल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

advertisement

ठरवून केलेला निवडणूक प्रक्रियेतील घोटाळा...

कर्नाटक सारखा प्रकार इथही घडला. एकाच ठिकाणाहून ठरवलेला घोटाळा असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. विमला, सरस्वती नावाने मतदान करणारी तरुणी ही ब्राझीलची तरुणी आहे. ब्राझीलची तरुणीचे हरियाणाच्या निवडणुकीत काय काम? असा सवाल राहुल गांधी यांनी केला. या महिलेच्या फोटोवर आधारित बनावट आयडी केवळ दोन मतदान केंद्रांमध्येच दोनशेहून अधिक वेगवेगळ्या नावांनी अस्तित्वात आहेत.

advertisement

दोन पोलिंग बूथ्सवरील सीसीटीव्ही फुटेज जानबूजकर डिलीट करण्यात आलं आहे, असं आमचं म्हणणं आहे. अशाच प्रकारे अनेक ठिकाणी ब्लर फोटो असलेली आयडी वापरून मतदान केलं गेलं. म्हणजे फसवणुकीचा पद्धतशीर डाव रचला गेला होता असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

भाजपकडून निवडणूक आयोगाची मदत...

निवडणूक आयोग थेट भाजपाची मदत घेत आहे, त्यामुळे मते चुकीच्या प्रकारे टाकली जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. भाजपाचा एक नेता उत्तर प्रदेश आणि हरियाणा दोन्ही ठिकाणी मतदान करत आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतीला पूरक निवडला व्यवसाय, 2 गायींपासून केली सुरूवात, महिन्याला दीड लाख उलाढाल
सर्व पहा

दिल्ली, उत्तर प्रदेशमधील अनेक मतदारांनी हरियाणामध्ये मतदान केले असल्याचे राहुल गांधी यांनी केला.

मराठी बातम्या/देश/
Rahul Gandhi : कोण आहे मिस्ट्री गर्ल, जिला राहुल गांधींनी शोधून काढलं, हरियाणात २२ वेळा केलं मतदान!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल