TRENDING:

Rahul Gandhi : शपथ घेतल्यानंतर इंडिया आघाडीकडून राहुल गांधींवर मोठी जबाबदारी! लाकसभेत दिसणार या भूमिकेत

Last Updated:

Rahul Gandhi : तब्बल 10 वर्षांनंतर लोकसभेत विरोधी पक्षनेता पाहायला मिळणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी या पदावर बसणार असल्याची माहिती मिळत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत चांगलं कमबॅक केल्यानंतर विरोधक आता संसद गाजवण्याच्या इराद्याने तयारी करत आहे. याची झलक शपथग्रहण करतेवेळीच पाहायला मिळाली. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) लोकसभेतील विरोधी पक्षनेते असण्यावर अखेर शिक्कामोर्तब झालंय. या निर्णयाबाबतचे पत्र प्रोटेम स्पीकर भर्तृहरि महताब यांना पाठवण्यात आले आहे. काँग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी यांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला.
विरोधी पक्षनेता राहुल गांधी
विरोधी पक्षनेता राहुल गांधी
advertisement

काँग्रेसचे वरिष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, "काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा (सोनिया गांधी) यांनी प्रोटेम स्पीकर भर्तृहरि महताब यांना पत्र लिहून त्यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी यांची नियुक्ती करण्याच्या निर्णयाची माहिती दिली आहे." इतर नियुक्त्यांबाबतही लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राहुल गांधी पाच वेळा खासदार राहिले असून सध्या ते लोकसभेत रायबरेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. मंगळवारी त्यांनी संविधानाची प्रत हातात घेऊन खासदारपदाची शपथ घेतली. सर्वात मोठा विरोधी पक्ष असल्याने काँग्रेसला 10 वर्षांनंतर विरोधी पक्षनेतेपद मिळाले आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये लोकसभेत एक पद मिळवण्यासाठी आवश्यक 10 टक्के सदस्य मिळवण्यात काँग्रेस अपयशी ठरली होती.

advertisement

वाचा - 'जय भीम, जय तेलंगणा, जय...' शपथ घेताना ओवेसींच्या घोषणांवरून गदारोळ

शपथग्रहण सोहळ्यात गदारोळ

शपथ ग्रहण केल्यानंतर काही खासदारांनी दिलेल्या घोषणांमुळे संसदेत गदारोळ झाला. यामध्ये एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी शपथ घेतल्यानंतर जय भीम, जय तेलंगणा आणि नंतर जय पॅलेस्टाईन अशा घोषणा दिल्या. त्यानंतर त्यांनी अल्लाह-ओ-अकबर…च्या घोषणाही दिल्या. यावर भाजपच्या अनेक सदस्यांनी आक्षेप व्यक्त केला होता. तर राज्यातील अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी बिहारला विशेष राज्याचा दर्जा आणि इतर काही गोष्टींची मागणी केली. यावर सभागृहात बसलेल्या खासदारांनी यावर आक्षेप घेतला. यानंतर पप्पू यादव देखील संतप्त झालेले पाहायला मिळाले. वास्तविक, पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी प्रणाम पूर्णिया, प्रणाम बिहार, सलाम बिहार, जोहर बिहारने शपथविधीची सुरुवात केली. यानंतर त्यांनी मैथिली भाषेत शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर पप्पू यादव यांनी बोलण्यास सुरुवात केली. 'रेनेट बिहारचे अनेक आभार, विशेष दर्जा, सीमांचल जिंदाबाद, मानवतावाद जिंदाबाद, भीम जिंदाबाद, संविधान जिंदाबाद'..

advertisement

मराठी बातम्या/देश/
Rahul Gandhi : शपथ घेतल्यानंतर इंडिया आघाडीकडून राहुल गांधींवर मोठी जबाबदारी! लाकसभेत दिसणार या भूमिकेत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल