Asaduddin Owaisi : 'जय भीम, जय तेलंगणा, जय...' शपथ घेताना ओवेसींच्या घोषणांवरून गदारोळ, भाजपने केली मोठी मागणी

Last Updated:

Asaduddin Owaisi : लोकसभेचे प्रोटेम स्पीकर आणि भाजप खासदार भर्त्रीहरी महताब सदस्यांना शपथ देत आहेत. दरम्यान, हैदराबादमधून निवडून आलेले खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या शपथविधीवेळी सभागृहात गदारोळ झाला.

शपथ घेताना ओवेसींच्या घोषणांवरून गदारोळ
शपथ घेताना ओवेसींच्या घोषणांवरून गदारोळ
नवी दिल्ली : 18व्या लोकसभेसाठी निवडून आलेल्या सदस्यांचा शपथविधी सोमवारपासून होत आहे. सभागृहाचे प्रोटेम स्पीकर भर्तृहरि महताब हे एक एक करून सर्व सदस्यांना सभागृहाच्या सदस्यत्वाची शपथ देत आहेत. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. यावेळी अनेक खासदार स्थानिक भाषा, तर वेगवेगळा जयकार करुन शपथ घेताना पाहायला मिळाले. दरम्यान, AIMIM नेते असदुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi take oath as member of parliament) यांनी शपथ घेतल्यानंतर दिलेल्या घोषणेवरुन वादात सापडण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत 350 हून अधिक खासदारांनी शपथ घेतली आहे. दरम्यान, मंगळवारी AIMIM नेते असदुद्दीन ओवेसी यांच्या शपथविधीवेळी लोकसभेत गदारोळ झाला. शपथ घेतल्यानंतर ओवेसींनी अशा घोषणा दिल्या, की त्यामुळे अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
शपथ घेतल्यानंतर असदुद्दीन ओवेसींनी जय भीम, जय तेलंगणा आणि नंतर जय पॅलेस्टाईन अशा घोषणा दिल्या. त्यानंतर त्यांनी अल्लाह-ओ-अकबर…च्या घोषणाही दिल्या. यावर भाजपच्या अनेक सदस्यांनी आक्षेप व्यक्त केला. त्यांनी निषेध नोंदवला. यावर प्रोटेम स्पीकर म्हणाले की, ओवेसी यांनी काही आक्षेपार्ह बोलले असेल तर ते कार्यवाहीच्या रेकॉर्डमधून काढून टाकले जाईल. ओवेसी हे हैदराबादमधून लोकसभेवर निवडून आले आहेत. ते पाचव्यांदा खासदार झाले आहेत.
advertisement
विरोधानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी यावर स्पष्टीकरण दिले. जय पॅलेस्टाईन अशी घोषणा संविधानाच्या विरोधात कशी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजप खासदार जी किशन रेड्डी यांचं काम विरोध करणे आहे, असंही ते म्हणाले.
निलेश लंके यांनी घेतली इंग्रजीत शपथ
अहमदनगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी लोकसभेमध्ये इंग्लिश भाषेमधून शपथ (Nilesh Lanke Takes Oath in English) घेतली आहे, निलेश लंके यांनी शपथ घेताच अहमदनगरमध्ये त्यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत एकमेकांना पेढे भरवले. निलेश लंके यांच्या इंग्रजीवरून अनेकदा त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता, मात्र आज त्यांनी इंग्लिशमधून शपथ घेत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिल्याची चर्चा सुरू आहे.
मराठी बातम्या/देश/
Asaduddin Owaisi : 'जय भीम, जय तेलंगणा, जय...' शपथ घेताना ओवेसींच्या घोषणांवरून गदारोळ, भाजपने केली मोठी मागणी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement