TRENDING:

कंडोम, गर्भपाताच्या गोळ्या, दारू... मुलांच्या बॅगमध्ये हादरवणाऱ्या गोष्टी, शिक्षकांची झोप उडाली!

Last Updated:

शिक्षकांनी शाळेमध्ये अचानक घेतलेल्या झडतीमध्ये विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये धक्कादायक गोष्टी सापडल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदाबाद : सेव्हन्थ-डे अॅडव्हेंटिस्ट (एसडीए) या उच्च माध्यमिक शाळेतील एका विद्यार्थ्याची शाळेमध्येच हत्या करण्यात आली, त्यामुळे शहरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं. या घटनेनंतर शाळांना कॅम्पस सुरक्षा कठोर करणं भाग पडलं आहे. अनेक शाळांनी अचानक मुलांच्या बॅगा तपासायला सुरूवात केली, पण यानंतर मुलांच्या बॅगमधून धक्कादायक गोष्टी बाहेर येत आहेत.
कंडोम, गर्भपाताच्या गोळ्या, दारू... मुलांच्या बॅगमध्ये हादरवणाऱ्या गोष्टी, शिक्षकांची झोप उडाली! (प्रातिनिधिक फोटो)
कंडोम, गर्भपाताच्या गोळ्या, दारू... मुलांच्या बॅगमध्ये हादरवणाऱ्या गोष्टी, शिक्षकांची झोप उडाली! (प्रातिनिधिक फोटो)
advertisement

विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये धक्कादायक गोष्टी

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या बॅग तपासणी दरम्यान सापडलेल्या वस्तू चिंताजनक आहेत. एका मुख्याध्यापकाने असे म्हटले आहे की, 'हे आश्चर्यकारक आणि चिंताजनक आहे. मुलांच्या बॅगमध्ये पुस्तके आणि टिफीनशिवाय मोबाईल, टॅबलेट, लायटकर, सिगरेट, इलेक्ट्रॉनिक सिगरेट आणि पाण्याच्या बॉटलमध्ये दारू आढळली आहे.'

दुसऱ्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी पुढे म्हटले की, 'आम्हाला व्हाइटनर, लिपस्टिक, काजळ, नेल फिलर, डिओडोरंट्स, गर्भनिरोधक गोळ्या, कंडोम आणि अगदी सुटे कपडे आणि शूज देखील सापडले.'

advertisement

याव्यतिरिक्त, अनेक शाळांनी केलेल्या तपासणीमध्ये मुलांच्या बॅगमध्ये ब्लेड, पेपर कटर आणि अगदी चेन देखील सापडल्या. एसडीए शाळेतील घटनेनंतर शालेय संस्थांनी शाळेत कात्री आणि राऊंडर आणण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. जोपर्यंत पालकांना शाळेकडून या वस्तू पाठवण्याची लेखी सूचना मिळत नाही, तोपर्यंत या वस्तू पाठवू नयेत, असा सूचना शाळांनी केल्या आहेत.

काही शाळांमध्ये शिक्षकांना मुलांच्या बॅगेमध्ये पत्ते, रोमँटिक आणि अश्लिल कादंबऱ्या, महागडी पेनं, चमकदार दागिनेही सापडले. पालकांना पालक-शिक्षण बैठकीदरम्यान या गोष्टी सांगितल्या जातात, पण पालक मुलं ऐकत नसल्याची तक्रार करतात. काही पालक प्रौढ पुस्तके सापडल्यानंतरही आरामात असतात, या गोष्टींना ते वाढत्या वयाचा भाग मानतात, अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी दिली आहे.

advertisement

विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये इम्पोर्टेड एनर्जी ड्रिंक

काही विद्यार्थ्यांच्या वॉटर बॉटलमध्ये तर 1500 रुपये किंमतीचं इम्पोर्टेड एनर्जी ड्रिंक सापडलं आहे. गृहपाठ आणि प्रोजेक्ट पूर्ण करणे, वर्गात जागा मिळवणे, याच्या बदल्यात ही एनर्जी ड्रिंक दिली जातात, असंही शाळेच्या व्यवस्थापनाने कबूल केलं आहे.

मराठी बातम्या/देश/
कंडोम, गर्भपाताच्या गोळ्या, दारू... मुलांच्या बॅगमध्ये हादरवणाऱ्या गोष्टी, शिक्षकांची झोप उडाली!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल