रंजक घटना घडली
यावेळी एक रंजक घटना समोर आली. पाकिस्तान देखील SCO चा सदस्य असल्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ या संमेलनासाठी उपस्थित होते. या भेटीदरम्यान असं काही घडलं, ज्याची त्यांनाही अपेक्षा नव्हती.
पाहा Video
आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तान एकाकी
सोमवारी पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन एकमेकांशी बोलत पुढे जात होते. तेव्हा शाहबाज शरीफ हात बांधून एका कोपऱ्यात उभे राहिलेले दिसले. विशेष म्हणजे, त्यांच्याशी कोणीही बोलत नव्हतं आणि त्यांच्या जवळ कोणी उभंही नव्हतं.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
पंतप्रधान मोदी आणि पुतिन पुढे जात असताना पाकिस्तानचे पंतप्रधान केवळ त्यांच्याकडे पाहत राहिले. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तान जागतिक मंचावर एकाकी पडल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एससीओच्या माध्यमातून पाकिस्तानला एक कडक संदेश दिला आहे. शाहबाज शरीफ यांना दुर्लक्ष करून, पंतप्रधान मोदींनी हे स्पष्ट केले आहे की दहशतवाद आणि संवाद कधीही एकत्र चालणार नाहीत.