सोमनचं आत्मसमर्पण
शिलाँगहून बेपत्ता झालेली सोनम आता उत्तर प्रदेशात सापडली आहे. राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पत्नी सोनमने यूपीतील गाजीपूर येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. रात्री उशिरा झालेल्या छाप्यात इतर तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली.
सोनम उत्तर प्रदेशात कशी पोहोचली?
राजाचा मोठा भाऊ विपिन रघुवंशी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सोनम सुरक्षित असल्याची माहिती मिळाल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. या घटनेमागील नेमकं कारण आणि सोनम उत्तर प्रदेशात कशी पोहोचली, याबाबतची अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केली होती.
advertisement
सीसीटीव्ही समोर
सोनम बेपत्ता झाल्यानंतर सोनमचा भाऊ सध्या सध्या शिलाँगमध्येच आहे. सोनमला शोधणाऱ्या टीमसोबतच तो आहे. सोनम आणि राजाला शेवटचे हॉटेलमधून बाहेर पडतानाचे सीसीटीव्ही समोर आले आहे. यामध्ये त्यांनी अॅक्टिव्हा भाड्याने घेतली. तिथे त्यांचे शेवटचे लोकेशन देखील ट्रेस करण्यात आले होते. पोलिसांना 21 मे चे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते. त्यात हे जोडपे शिलॉंगमधील एका वेगळ्या होमस्टेमध्ये चेक इन करताना दिसत आहे. 4 मिनिटे आणि 53 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये, राजा आणि सोनम दोघेही काळ्या जॅकेटमध्ये, एका पांढऱ्या सुटकेससह होमस्टेमध्ये पोहोचलेले दिसत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
इंदौरचे राजा रघुवंशी आणि त्यांती पत्नी सोनम रघुवंसी यांचा विवाह 11 मे रोजी झाला. विवाहानंतर 20 मे रोजी ते हनीमूनला शिलाँगला गेले. कुटुंबाशी त्यांचे शेवटचे बोलणे 23 मे च्या दुपारी झाले होते, त्यानंतर त्यांचा फोन बंद होता. कोणताही संपर्क होत नसल्याने राजा आणि सोनमचा भाऊ इंदौरहून शिलाँगला रवाना झाला. तिथे तपास करताना 2 जून रोजी राजाचा मृतदेह आढळून आला, तर सोनम बेपत्ता असल्याचं समोर आलं होतं.