TRENDING:

सोनम वांगचुकांची तब्बल १७० दिवसांनंतर होणार सुटका! केंद्र सरकारने NSA हटवला

Last Updated:

Sonam Wangchuk : लडाखमधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्याबाबत केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : लडाखमधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्याबाबत केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. वांगचुक यांच्यावर लावण्यात आलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) केंद्र सरकारने शनिवारी मागे घेतला असून, हा आदेश तत्काळ लागू करण्यात आला आहे.
Sonam Wangchuk
Sonam Wangchuk
advertisement

काय आहे प्रकरण?

२४ सप्टेंबर २०२५ रोजी लेहमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनानंतर प्रशासनाने ही कारवाई केली होती. या हिंसेला चिथावणी दिल्याचा आरोप वांगचुक यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी त्यांना 'रासुका' अंतर्गत ताब्यात घेऊन जोधपूर जेलमध्ये ठेवण्यात आले होते. या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू झाला होता, तर १५० हून अधिक जण जखमी झाले होते.

advertisement

गृह मंत्रालयानं दिलं स्पष्टीकरण

केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, वांगचुक यांनी त्यांच्या ताब्यात राहण्याच्या कालावधीचा निम्म्याहून अधिक काळ पूर्ण केला आहे. गेल्या साडेपाच महिन्यांपासून म्हणजेच सुमारे १७० दिवसांपासून ते तुरुंगात होते. आता त्यांची लवकरच सुटका होणार आहे.

लडाखची मागणी काय?

सोनम वांगचुक आणि लडाखमधील नागरिक प्रामुख्याने दोन मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत.लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा. सहाव्या अनुसूचींतर्गत (6th Schedule) लडाखला घटनात्मक संरक्षण मिळावे.

advertisement

काय असतो राष्ट्रीय सुरक्षा कायदा?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळी दर घसरलेलेच, लिंबू आणि कांद्याला काय मिळाला भाव, एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

हा एक असा कायदा आहे जो सरकारला 'देशाची सुरक्षा' किंवा 'सार्वजनिक सुव्यवस्था' धोक्यात आणणाऱ्या व्यक्तीला विना खटला ताब्यात घेण्याचा अधिकार देतो. या कायद्यांतर्गत एखाद्या व्यक्तीला जास्तीत जास्त १२ महिन्यांपर्यंत नजरकैदेत ठेवता येते.

मराठी बातम्या/देश/
सोनम वांगचुकांची तब्बल १७० दिवसांनंतर होणार सुटका! केंद्र सरकारने NSA हटवला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल