TRENDING:

त्याचं मेडिकल सपोर्ट काढून टाका! 31 वर्षांचा मुलगा 13 वर्षे बेडवर, बापाने मागितलं मरण, सुप्रीम कोर्टाने दिली परवानगी

Last Updated:

रीश राणा गेल्या 13 वर्षांपासून अंथरुणाला खिळून आहेत. त्यांना हालचाल करता येत नाही आणि त्यांच्या बरे होण्याची शक्यता जवळजवळ शून्य मानली जाते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जीवनमृत्यू कुणाच्या हातात नाही. पण एक 31 वर्षांची व्यक्ती जी गेली 13 वर्षे अंथरूणाला खिळली होती. या व्यक्तीला सुप्रीम कोर्टाने इच्छामरणाची परवानगी दिली आहे. हरीश राणा असं या व्यक्तीचं नाव असून त्याच्या पालकांनी त्याच्या इच्छामरणासाठी परवानगी मागितली होती आणि सर्वोच्च न्यायालयाने ती मंजूर केली.
News18
News18
advertisement

गाझियाबादमधील येथील हरीश राणा गेली 13 वर्षे अंथरुणाला खिळून आहे. हरीश राणाच्या वडिलांनी पॅसिव्ह युथेनेशियाची परवानगी देण्यासाठी न्यायालयाकडे अपील केलं. त्यांचा मुलगा गेल्या 13 वर्षांपासून अशा अवस्थेतच आहे की तो बरा होण्याची शक्यता नाही. 13 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात हरीश राणाच्या पालकांशी बोलले आणि त्यांची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याच्या वकिलाने न्यायालयाला हरीश राणाला जिवंत ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम ट्युब आणि जीवरक्षक उपकरणं काढून टाकण्याची परवानगी देण्याची विनंती केली.

advertisement

या प्रकरणात कोर्टाने मेडिकल बोर्ड नियुक्त केला. या बोर्डने आपला अहवाल सादर केला. अहवालात असं म्हटलं आहे की हरीश बरा होण्याची कोणतीही शक्यता नाही. सरकारनेही मेडिकल बोर्डच्या रिपोर्टचंसमर्थन केले. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी आपला निर्णय राखून ठेवला होता, जो आता देण्यात आला आहे.

स्त्री बीजांची विक्री! म्हणजे नेमकं करतात काय, महिलांच्या शरीरातून बीज कसे काढतात?

advertisement

हरिशला हालचाल करता येत नाही आणि तो बरा होण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. या सर्व बाबींचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने त्याला पॅसिव्ह युथेनेशियाची परवानगी दिली आहे.  सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, मेडिकल बोर्डने उपचार बंद केल्याची पुष्टी केली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही. याचिकाकर्त्याची मेडिकल सपोर्ट सिस्टम काढून टाकली पाहिजे. उपचार बंद ,करण्याची प्रक्रिया मानवी असली पाहिजे. यासाठी एक पद्धतशीर चौकटीची गरज आहे.

advertisement

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याचिकेवर निकाल देताना असं निरीक्षण नोंदवलं की, एखाद्या व्यक्तीला परिस्थितीत मृत्यू निवडण्याचा अधिकार दिला जाऊ शकतो का? न्यायालयांना अनेकदा या कठीण प्रश्नाचा सामना करावा लागतो.

प्रसिद्ध अमेरिकन तत्वज्ञानी हेन्री डेव्हिड थोरो यांच उदाहरण देताना न्यायमूर्ती जेबी पारदीवाला म्हणाले, "माणसाला आयुष्य हवं की नको हे देव माणसाला विचारत नाही. जीवन घ्यावंच लागतं. जेव्हा न्यायालयांना एखाद्या व्यक्तीला त्याचं जीवन संपवण्याचा पर्याय देता येईल का? हे ठरवायचं असतं तेव्हा हा विचार विशेष महत्त्वाचा ठरतो" या संदर्भात पारदीवाला यांनी विल्यम शेक्सपियर यांचं प्रसिद्ध वाक्य टू बी ऑर नॉट टू बी, याचाही उल्लेख केला. हा प्रश्न संविधानिक आणि कायदेशीरदेखील आहे.

advertisement

"बेडरूममध्ये जे पाहिलं ते..." पत्नीने मंत्र्याला नको त्या अवस्थेत रंगेहात पकडलं, राजकारणात खळबळ

न्यायमूर्ती पारदीवाला यांनी नमूद केलं की, या निर्णयात न्यायालयाने चार महत्त्वाच्या बाबींचा विचार केला आहे. सक्रिय इच्छामरण आणि निष्क्रिय इच्छामरण यांच्यातील फरक, संविधानाच्या कलम 21 अंतर्गत निष्क्रिय इच्छामरणाची परवानगी, ऐच्छिक निष्क्रिय इच्छामरणाच्या मर्यादा आणि कायदेशीर स्वरूप आणि सन्मानाने जीवनाचा अधिकार आणि मृत्यूचा अधिकार यांच्यातील संतुलन.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली, तीन तास ते काम केलं अन् आयुष्य बदललं, कमाईचा आकडा तर पाहा, Video
सर्व पहा

न्यायालयाच्या मते या प्रकरणात मुख्य संवैधानिक प्रश्न असा आहे की संविधानाच्या कलम 21 अंतर्गत हमी दिलेल्या जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार इतका अर्थ लावता येईल का की एखाद्या व्यक्तीला काही विशिष्ट परिस्थितीत सन्माननीय मृत्यूचा पर्याय देखील मिळतो.

मराठी बातम्या/देश/
त्याचं मेडिकल सपोर्ट काढून टाका! 31 वर्षांचा मुलगा 13 वर्षे बेडवर, बापाने मागितलं मरण, सुप्रीम कोर्टाने दिली परवानगी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल